Rahul Gandhi on Central Government: PR, अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याऐवजी Corona Vaccine, ऑक्सीजन पुरवठ्याकडे लक्ष द्या; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सल्ला
Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

अवघा देश कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या गंभीर संकटाशी सामना करत आहे. कोरोना नियंत्रण करण्यासाठी देशीातील आरोग्य यंत्रणा अतिशय तोकडी पडते आहे. देशातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होऊन रुग्णांना आराम मिळावा तसेच नागरिकांना मदत व्हावी, असे सांगत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत शनिवारी (24 एप्रिल) म्हटले की, पीआर (PR) आणि इतर अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी केंद्र सरकारने कोरोना लसीकरण (Corona Vaccination) आणि ऑक्सिजन (Oxygen) पुरवठ्यावर लक्ष द्यायला हवे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'सद्भावनेने केंद्र सरकारला अवाहन करत आहे की, , पीआर (PR) आणि इतर अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी केंद्र सरकारने कोरोना लसीकरण आणि ऑक्सिजन पुरवठ्यावर तसेच इतर आरोग्यदायी सेवा देण्यावर केंद्र सरकारने लक्ष द्यावे. येणाऱ्या काळात हे संकट अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी देशाला तयार राहावे लागेल. वर्तमान स्थिती होत असलेली दुर्दशा अत्यंत असहनशील आहे.'

देशभरातील अनेक राज्यांतील शहरांतून आणि रुग्णालयांतून अत्यंत दु:खदायक बातम्या येत आहेत. काही रुग्णालयांतील अतिदक्षाता विभागात आग लागत आहे, कही ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्याने रुग्ण दगावत आहेत. कुठे ऑक्सिजन टाकीत गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी गांभीर्याने पावले टाकायला हवीत. देशभरातून कोरोना लस, ऑक्सिजन आणि इतर सेवांसाठी केंद्र सरकारकडे मागणी वाढली आहे. (हेही वाचा, Home Quarantine असलेल्या Rahul Gandhi यांचा मोदी सरकार वर ट्वीट करत निशाणा; 'देशाला खोटे उत्सव, पोकळ भाषण नव्हे 'समाधान' हवयं')

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात 3,46,786 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. 2,624 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर 2,19,838 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील कोरोना संक्रमितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1,66,10,481 इतकी झाली आहे. त्यापैकी 1,38,67,997 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 1,89,544 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्यास्थितीत 25,52,940 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 13,83,79,832 नागरिकांनी कोरोनावरील लस घेतली आहे.