Vaxifair Scheme: कोरोना लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेल्या प्रवाशांना विमान प्रवासावर मिळणार 10 टक्के सुट, 'या' कंपनीने सुरू केली योजना
indigo (pic credit - indigo twitter)

कोरोनाची लस (Corona Vaccine) घेऊन विमानाने (Plane) प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांसाठी (Passengers) एक आनंदाची बातमी आहे. लस घेऊन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना इंडिगो (Indigo) विमान भाड्यात 10 टक्के सूट देईल.  इंडिगोने पुन्हा वॅक्सी फेअर योजना आणली आहे. ज्यामध्ये ज्या प्रवाशांना कोरोनाची लस मिळाली आहे. त्यांना मूळ हवाई भाड्यात 10 टक्के सूट दिली जाईल. कोरोना लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इंडिगोने पुन्हा ही योजना आणली आहे. यासोबतच अधिकाधिक लोकांना विमानाने प्रवास करण्याची प्रेरणा मिळेल, अशी विमान कंपन्यांना आशा आहे. इंडिगोने 2 फेब्रुवारी 2022 रोजी ट्विटद्वारे वॅक्सी फेअर योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हेही वाचा अल्पवयीन मुलांना Freefire Game चे व्यसन; गेम खेळण्यासाठी घरातून लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी

कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेमुळे हवाई प्रवास कमी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एअरलाइनने हा प्रस्ताव प्रथम ऑगस्ट 2021 मध्ये सादर केला. ही सवलत बुकिंगच्या तारखेपासून 15 दिवसांनंतरच्या तारखांना लागू होईल. जेव्हा प्रवाशाने इंडिगोच्या वेबसाइटवर तिकीट बुक केले असेल तेव्हाच ऑफरचा लाभ वैध असेल. सवलतीचे भाडे बुकिंगच्या वेळी 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रवाशांसाठीच लागू आहे.

इंडिगोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेले कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल. तुम्हाला तुमची लसीकरण स्थिती विमानतळ चेक-इन काउंटरवर आरोग्य सेतू मोबाइल अॅपवर दाखवावी लागेल. अन्यथा, भाडे आणि सवलतीच्या भाड्यातील फरक प्रवाशांकडून वसूल केला जाईल.