Air India Express Flight (PC -Wikimedia Commons)

Kerala Man Misbehaves With Crew: दुबई आणि मंगळुरू दरम्यान एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट (Air India Express Flight) मध्ये क्रूसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी केरळमधील (Kerala) एका व्यक्तीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. या व्यक्तीने विमानातून उडी मारण्याचीही धमकी दिली. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सुरक्षा समन्वयक सिद्धार्थ दास यांनी प्रवाशाविरुद्ध तक्रार दाखल केली. ज्यानंतर विमान मंगळुरू येथे उतरल्यावर विमानतळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, मुहम्मद बीसी असं या प्रवाशाचं नाव असून तो केरळमधील कन्नूर येथील आहे. मुहम्मद 8 मे रोजी दुबईहून मंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमधून प्रवास करत होता. त्याने कथितपणे बेशिस्त वर्तन केले. तसेच फ्लाइट दरम्यान अडथळा निर्माण केला. त्याने विमानातून समुद्रात उडी मारण्याची धमकी दिली, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा -Cancellation of Flights of Air India Express: MoCA ने मागवला एअर इंडिया एक्सप्रेस च्या विमान रद्द प्रकरणी मागवला अहवाल)

उड्डाण मंगळुरूला आल्यावर विमानतळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी औपचारिक तक्रारीसह बाजपे पोलिस स्टेशनला सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.