Nirbhaya Gang Rape Case: निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी लाईव्ह टेलिकास्ट करा; 'परी' संस्थेची मागणी
Delhi Nirbhaya Gang Rape Case (PC- Twitter)

Nirbhaya Gang Rape Case: निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी लाईव्ह टेलिकास्ट (Live Telecast) करा दाखवा, अशी मागणी 'परी' (पीपल अगेंस्ट रेप इन इंडिया) (Pari NGO) या सामाजिक संस्थेने केली आहे. यासाठी परी संस्थेने माहिती प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहलं आहे. यात निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना 22 जानेवारी रोजी देण्यात येणारी फाशीची शिक्षा लाईव्ह टेलिकास्ट करा. यासाठी देश आणि विदेशातील मीडिया संस्थांना परवानगी द्या, असंही सांगण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा आदेश दिला. या आदेशाची मी स्वागत करते. परंतु, ही शिक्षा देताना या घटनेचे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात यावं. यासाठी सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी परी संस्थेच्या संस्थापक योगिता भयाना यांनी केली आहे. तसेच भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. (हेही वाचा - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण: फाशी रद्द करण्याच्या मागणीसाठी दोषी विनय कुमार सर्वोच्च न्यायालयात)

दरम्यान, वकील आसिम सरोदे यांनी या मागणीला विरोध दर्शवला आहे. फाशीची शिक्षा लाईव्ह करण्यात यावी, ही मागणी अतिशय बालिश असल्याचे म्हटले आहे. शिक्षा हा प्रदर्शन करण्याचा मुद्दा नाही. त्यामुळे शिक्षेचे लाईव्ह करणं हे समाजातील बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनीही या मागणीला विरोध दर्शवला आहे.