Gujarat Parcel Bomb Blast In Sabarmati: गुजरातमधील अहमदाबादमधील साबरमती (Sabarmati) परिसरात एका पार्सलमध्ये झालेल्या स्फोटामुळे (Blast In Parcel) खळबळ उडाली आहे. या घटनेत पार्सल डिलिव्हरी करणारी व्यक्ती आणि पार्सल घेणारा दोघेही जखमी झाले. शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास शिवम रो हाऊस येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्सलमध्ये बॅटरीचा स्फोट झाला. पार्सल स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
आरोपीला अटक -
पोलीस अधिकारी नीरज कुमार बारगुर्जर यांनी सांगितले की, गौरव गढवी नावाचा एक व्यक्ती साबरमती येथील बलदेव यांच्या घरी आला आणि त्याने पार्सल फोडले. आरोपी गौरव गढवी याला अटक करण्यात आली आहे. दोघांमध्ये अंतर्गत वाद होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. घटनास्थळी पोलीस, बॉम्बशोधक पथक, श्वानपथक, एफएसएल हजर आहे. (हेही वाचा -Bomb Explodes During Training Exercise In Bikaner: बिकानेर फील्ड फायरिंग रेंजमध्ये तोफांच्या सराव दरम्यान बॉम्बचा स्फोट; 2 जवानांचा मृत्यू, एक जखमी)
डिलिव्हरीदरम्यान पार्सलचा स्फोट -
#WATCH | Gujarat: Police, Bomb Disposal Squad, Dog Squad, FSL arrive at the spot in Sabarmati where a parcel explosion took place. https://t.co/Cb3W3tukQA pic.twitter.com/2vGlQZi7eC
— ANI (@ANI) December 21, 2024
आरोपीने पार्सल तयार करून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. पार्सलमध्ये ब्लेड आणि इलेक्ट्रॉनिक स्विचही होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. साबरमती पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव गौरव गढवी असे असून तो बलदेवभाईंना पार्सल देण्यासाठी येथे आला होता. मात्र, डिलिव्हरीदरम्यान पार्सलचा स्फोट झाला, त्यात बलदेवभाईचा भाऊ किरीट सुखडिया आणि स्वत: गढवी जखमी झाले. (हेही वाचा -Himachal Pradesh Phone Blast: चार्जिंगवर असताना फोन वापरत होती युवती; इंटरनेट सुरु करताच झाला मोठा स्फोट, उपचारादरम्यान मृत्यू)
कौटुंबिक वादातून घडवण्यात आला स्फोट -
दरम्यान, तपासात हा स्फोट वैयक्तिक कौटुंबिक वादातून समोर आले आहे. तसेच स्फोटात दारूच्या कंटेनरचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. स्फोट घडवून आणणाऱ्यांची नावे समोर आली असून असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.