Terrorist Killed In Budgam: जम्मू-काश्मीरमधील बडगामच्या कावूस खलिसा भागात संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा
Indian Army | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Terrorist Killed In Budgam: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बडगामच्या कावूस खलिसा भागात (Kawoosa Khalisa Area of Budgam) संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा (Terrorist Killed) करण्यात आला आहे. यासंदर्भात भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडने माहिती दिली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी सुरू होती. बडगाम जिल्ह्यातील कावसूसा खलिसा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. (हेही वाचा - Ayodhya Ram Temple: श्री राम मंदिर ट्रस्टच्या बँक खात्यात लाखो रुपयांची फसवणूक; क्लोन चेकचा वापर करून मारला डल्ला, FIR दाखल)

दरम्यान, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलाच्या पथकाने जेव्हा या भागाला घेराव घातला,तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील सैनिकांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. यास भारतीय सैनिकांनी चोख प्रतिउत्तर दिलं. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे.