Proposed model of Ram temple (Photo Credits: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra)

अयोध्या (Ayodhya) येथील राम मंदिर बांधकामाची तयारी सुरु झाली आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचे दान बँकेत जमा झाले आहे. मात्र आता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) खात्यातून फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. लखनौमधील एका बँकेतून क्लोन चेकद्वारे (Cloned Cheques) ट्रस्टच्या खात्यातून 6 लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत. त्यानंतर ट्रस्टने अयोध्या कोतवालीमध्ये एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तिसर्‍या क्लोन चेकद्वारे पैसे काढणे जात असताना पडताळणी दरम्यान ही गोष्ट लक्षात आली.

सीओ अयोध्या राजेश राय यांच्या म्हणण्यानुसार, लखनौमधील एका बँकेकडून क्लोन चेकचा वापर करून, 1 सप्टेंबरला अडीच लाख रुपये आणि तीन सप्टेंबरला साडेतीन लाख रुपये काढून घेण्यात आले. बँक ऑफ बडोदामध्ये तिसरा बनावट चेकद्वारे तब्बल 9,86000 प्रयत्न केला असता, बँक अधिकाऱ्यांनी ट्रस्टचे सरचिटणीस चम्पत राय यांना पडताळणीसाठी फोन केला. यानंतर महासचिवांनी इतका मोठा धनादेश देण्यास नकार दिला.

ट्रस्ट अधिकाऱ्यांनी तसे सांगितल्यावर, बँकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पैसे काढणे बंद केले. सीओ म्हणाले की, ट्रस्टच्या सरचिटणीसांनी अयोध्या कोतवालीमध्ये एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. याशिवाय ट्रस्टमधून पैसे काढलेल्या पैशांचा वापर कोणी केला याचा शोध घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. आता ट्रस्टची सर्व खाती लॉक झाली आहेत. 6 लाख लखनऊच्या पंजाब नॅशनल बँक मधून काढण्यात आले आहे. (हेही वाचा: राम मंदिर भूमिपूजनवर शुभेच्छा देणाऱ्या मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांला जीवे मारण्याची धमकी; पंतप्रधान मोदी, अमित शाहकडे मागितली मदत)

दरम्यान, अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिराचा पाया खोदण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले आहे. सीबीआरआय आणि आयआयटी, चेन्नईच्या तज्ज्ञांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारे मंदिराच्या पायाभरणीची रचना तयार केली जात आहे.