कोरोना महामारीच्या काळात सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, ऑनलाइन बँकिंग फ्रॉड, सोशल मीडियाद्वारे होणारे गुन्हे आणि ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लूबाडल्याचा घटना घडत आहेत. यातच एका व्यक्तीने नागरिकांची लूट करण्यासाठी चक्क आरोटीओची बनावट वेबसाईट बनवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वेबसाईच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत 3 हजार 300 जणांना लुबाडले आहे. तर, त्यांच्याकडून एकूण 70 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातील संचालक पियुष जैन यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आरोपी आरोटीओची बनावट वेबसाईट चालवायचा. तसेच लोकांकडून आरटीओ दस्तऐवज देण्यासाठी फी आकारत होता. प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.आरोपीने आतापर्यंत 70 लाख आणि 3 हजार 300 जणांची फसवणूक केली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केल्याचे डीसीपी सायबर सेल केपीएस मल्होत्रा म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Jammu Kashmir Update: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केला शाळेत गोळीबार, हल्ल्यात 2 शिक्षक ठार
दरम्यान, फसवणूक झालेल्या व्यक्तींच्या बँक स्टेटमेंटची तपासणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने ग्लोबल इंडिया या नावाच्या खात्याद्वारे हे व्यवहार केले आहेत. तपासात असेही उघड झाले की एक यंत्रणा विकसित करण्यात आली होती. ज्यामुळे इंटरनेटवर शोध घेताना फिशिंग वेबसाइट प्रथम दिसेल. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.