Gujarat Borewell PC ANI

Gujarat: गुजरातमधील अमरेलीमधील(Amreli) सुरगापारा गावात 45 ते 50 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षाच्या मुलीला शनिवारी सकाळी 15 तासांच्या ऑपरेशननंतर बाहेर काढण्यात आले. पण दुर्दैवाने डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले आहे. मुलगा बोअरवेलमध्ये पडलेल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु झाले. (हेही वाचा- शीना बोरा हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा गायब; हाडे व अवशेष सापडत नसल्याची सीबीआयची माहिती)

मिळालेल्या माहितीनुसार, बालकाला सकाळी 5.10 वाजता बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. अमरेली सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्याने दिली. घटनास्थळी शुक्रवार पासून बचावकार्य सुरु होते. 15 तासांच्या ऑपरेशननंतर मुलाला बाहेर काढण्यात आले. मुलीला पाहून आईने हंबरडा फोडला. या घटनेनंतर गावात शोक व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी खेळता खेळता घराच्या बाजूला असलेल्या बोअरवेलमध्ये दीड वर्षीची मुलगी पडली. या घटनेनंतर बचावकार्य सुरु झालं. बोअरवेल सुमारे 50 फूट खोल होता. अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यातून पाहिले. मुलीचा चेहरा वरच्या बाजूला अडकला होता आणि हात आणि पाय खाली अडकले होते. तीला श्वार घेण्यासाठई ऑक्सिजन दिला जात होता. मुलीला डोक्यावर धरून वर काढण्याचे प्रयत्न सुरू होता.