प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Twitter)

ट्राय (TRAI) ने आपल्या ग्राहकांना मेसेजस पाठवून नव्या नियमांविषयी सूचना देण्यास सुरुवात केली आहे. हा नियम DTH आणि केबल ऑपरेटर यांनाही लागू आहे. आता ट्रायच्या नव्या नियमांनुसार तुम्ही 130 (जीएसटीसह 153.40 पैसे) रुपयांत तुमच्या आवडीच्या 100 वाहिन्या पाहू शकता. केबल ऑपरेटर आणि ट्राय यांच्यामध्ये चाललेल्या शीतयुद्धामुळे ग्राहकांना 31 जानेवारीपर्यंत त्यांना हव्या असलेल्या वाहिन्या निवडण्यास सांगितले होते. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून त्या नवीन वाहिन्या दाखवण्यास सुरुवात होणार होती. मात्र ग्राहक आता 130 रुपयांच्या पॅकमध्ये 100 निःशुल्क किंवा शुल्क असलेल्या वाहिन्या पाहू शकतात.

याबाबत ग्राहकांनी आपआपल्या सेवा पुरवठादारांशी संपर्क साधून योग्य ती माहिती घ्यावी. योग्य माहिती मिळत नसल्यास ग्राहक 011-23237922 (ए.के.भारद्वाज), 011-23220209 (अरविंद कुमार) या क्रमांकांवर फोन करु शकतात, किंवा advbcs-2@trai.gov.in आणि arvind@gov.in या इमेल आयडीवर मेल करुन माहिती जाणून घेऊ शकतात. (हेही वाचा : टीव्ही वाहिन्यांबाबत TRAI चे नवे नियम; 130 रुपयांत तब्बल 100 चॅनेल्स पाहायची संधी)

ट्रायने वाहिन्यांचे दर हे जास्तीत जास्त 19 रुपये असावेत असे सांगितले आहे. त्यानुसार 130 रुपयांचे बेस पॅक आणि त्यानंतर हव्या असलेल्या वाहिन्यांसाठी त्या त्या वाहिन्यांप्रमाणे दर आकारले जाणार आहे. यासाठी कलर्स, झी, सोनी, स्टार अशा वाहिन्यांचे एकत्रित पॅकही उपलब्ध आहेत.