![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/Convicts-in-Nirbhaya-gangrape-and-murder-case-784x441-380x214.jpg)
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील (Nirbhaya Case) चारही दोषींना 3 फेब्रुवारी फाशी देण्यात येणार होती. मात्र, दोषींपैकी एक असलेल्या पवन गुप्ता (Pawan Gupta) याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली आहे. या याचिकेवर निर्णय झाला नाही. यामुळे याप्रकरणातील दोषींना होणारी फाशी पुन्हा एकदा तात्पुरती टळली आहे. तसेच पुढील आदेश येऊपर्यंत दिल्ली पटियाला हाऊस कोर्टोने (Delhi Patiala House court) दोषींच्या फाशीवर स्थगिती दिली आहे. सर्व कार्यवाही आणि प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडली असती तर, दोषींना उद्या सकाळी 6 वाजता फाशी देण्यात आली असते. याप्रकरणातील आरोपींची फाशी लांबणीवर जाण्याची ही तिसरी वेळ असून निर्भयाच्या आईने या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोपींना कधी फाशी होणार? असा प्रश्नही त्याठिकाणी उपस्थित केला आहे.
दिल्लीत 2012 मध्ये मेडिकलला शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य करुन तिला चालत्या बसमधून नग्न अवस्थेत फेकूनही दिले होते. 16 डिसेंबर 2013 ला घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आले. मात्र 29 डिसेंबर 2012 ला निर्भयाचा मृत्यू झाला. यानंतर याप्रकरणातील सर्वआरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणातील आरोपींना कोर्टाने मार्च 2013 मध्ये फाशी शिक्षा सुनावली होती. त्यापैकी एकाने तिहार तुरूंगात आत्महत्या केली होती. ज्यावेळी ही घटना घडली दोषींपैकी एक पवन गुप्ता हा अल्पवयीन होता. आपल्याला फाशी ऐवजी जन्मठेप देण्यात यावी अशी याचिका पवन कुमारने केली होती. ती कोर्टाने फेटाळल्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे निर्भयाच्या आरोपींना फाशी होणारच हे निश्चित झाले होते. मात्र, दिल्ली कोर्टाच्या निर्णयामुळे चारही दोषींची उद्या होणारी फाशी तात्पुरती टळली आहे. हे देखील वाचा- दिल्ली हिंसाचारावर आज संसदेत चर्चा; काँग्रेस लावून धरणार अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी
ट्वीट-
2012 Delhi gang-rape case: A Delhi Court has deferred the matter as the mercy petition of one of the convicts, Pawan is pending before the President of India https://t.co/rwEpu1VLWk
— ANI (@ANI) March 2, 2020
निर्भयाच्या दोषींना उद्या होणाऱ्या फाशीवर पटियाला हाउस कोर्टाने स्थगिती दिल्याने यावर निर्भयाच्या आईचा संताप व्यक्त केला आहे. आपल्या देशातील यंत्रणा ही गुन्हेगारांना पाठिशी घालणारी आहे, असे निर्भयाची आई म्हणाली. 'निर्भया'च्या दोषींना नक्की कधी फाशी दिली जाईल? असा सवाल त्यांनी सरकार आणि कोर्टाला केला.