Zomato कंपनीकडून खुलासा; Hrithik Roshan आणि Katrina Kaif यांना घेऊन केलेल्या जाहीरातींवरील वादावर स्पष्टीकरण
Zomato Advertisements | (Photo Credit: Zomato )

ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो (Zomato ) कंपनीने नुकतीच कर्मचारी कपात केली. त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकल्या. एका बाजूला झोमॅटोने कर्मचारी कपात केली असताना दुसऱ्या बाजूला मात्र हृतिक रोशन (Hrithik Roshan) , कतरीना कैफ (Katrina Kaif) आदी स्टार्सना घेऊन जाहिराती सुरु केला आहेत. या जाहिरातींवरुन झोमॅटोवर (Zomato

Advertisements) टीकेचा जोरदार वर्षाव होतो आहे. त्यामुळे या जाहिराती चर्चेत आल्या आहेत. या जाहिरातींवरुन सुरु झालेल्या वाद (Zomato Controversy) आणि चर्चांची दखल घेऊन मग झोमॅटोनेच खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे.

जाहीरातींवरुन झोमॅटोवर टीका करणाऱ्या टीकाकारांचे म्हणने असे की, एका बाजूला कोरोना व्हायरस महामारी आणि इतर कारणे पुढे करत झोमॅटो कामगार कपात करत आहे. मुळात झोमॅटो कामगारांना अत्यल्प वेतन मिळते. अत्यल्प वेतनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कंपनी एका बाजूला कामावरुन काढत आहे. तर दुसऱ्या बाजूला आपली प्रतिमा संवर्धन करण्यासाठी कंपनी हृतिक रोशन (Hrithik Roshan) , कतरीना कैफ (Katrina Kaif) यांसारख्या बड्या स्टार्सना घेऊन जाहिराती करत आहे. या स्टार्स आणि जाहिरातींवर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. (हेही वाचा, Zomato Shares: शेअर बाजारात झोमॅटो तेजीत, पदार्पणात दमदार कामगिरी, दुप्पट फायदा)

झोमॅटो जाहीरात

झोमॅटो जाहीरात

जाहिरातींवरुन नर्माण झालेल्या वादावर झोमॅटोने एक खुलासा करत एका प्रतिक्रियेद्वारा स्पष्टीकरण दिले आहे. झोमॅटोने म्हटले आहे की, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. प्रत्येकजण बाजू आपल्या पद्धतीने विचार करुन मांडतो. आमचे डिलिव्हरी बॉय उन, वारा, पाऊस यांची परवा न करता काम करतात. त्यांच्याकडे एक डिलिव्हरी केल्यानंर एक मिनीटही नसतो. त्यांना लगेचच पुढच्या डिलिव्हरीसाठी जायचे असते. त्यामुळे आमचे डिलिव्हरी बॉय हे हृतिक रोशन, कतरीना कैफ यांच्यासारखेच स्टार आहेत. त्यामुळे जाहीरातीचा उद्देश डिलिव्हरी बॉईजना अधिक सामावून घेणे हाच आहे.

झोमॅटो ट्विट

झोमॅटोने पुढे म्हटले आहे की, आम्ही समजू शकतो की आपण आमच्याकडून अधिक चांगली अपेक्षा ठेवता. आम्ही ही जाहीरात चांगला हेतू ठेऊनच बनवली होती. परंतू, काही लोकांनी याचा चुकीचा अर्थ घेतला. दरम्यान, आम्ही डिलिव्हरी पार्टनर्स सोबत सर्व मुद्दे अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करु.