Zomato | (Photo Credit: Twitter)

झोमॅटो (Zomato) कंपनीने पदार्पणातच दमदार कामगिरी केली आहे. आज शेअर बाजार ( Stock Market) सुरु झाला तेव्ह झोमॅटोने जबरदस्त कामगिरी करत सुरुवात केली. कंपनीचा एक समभाग ( Zomato Shares) जवळपास 115 रुपये इतका झाला. हे मूल्य आयपीओच्या वेळी प्रति शेअर 76 रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यात आता थोडी थोडकी नव्हे तर 51% वाढ झाली. झोमॅटोने अगदीच अल्पावदीत केलेली ही सर्वात चांगल्या कामगिरीपैकी एक समजली जात आहे. झोमॅटोच्या समभागांनी ही कामगिरी आज (शुक्रवार, 23 जुलै) केली.

बाजार सुरु होताच झोमॅटोचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर ऋची दाखवली. त्यामुळे झोमॅटो समभाग मोठ्या प्रमाणावर वधारले. ही वाढ 82% वाढ होऊन प्रति समभाग 139 रुपयांवर पोहोचले. शेअर बाजारातील झोमॅटोच्या भांडवली मूल्याचा विचार करता ही कामगिरी तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचली. इतका मोठा पल्ला झोमॅटोने अवघ्या काही मिनिटांमध्ये गाठला. त्यामुळे ज्या गुंतवणुकदारांनी झोमॅटोमध्ये आगोदर गुंतवणूक केली आहे त्यांची गुंतवणूक जवळपास दुपटीने वाढली.

तर, काही वेळातच गुंतवणूकदारांनी या शेअरच्या खरेदीसाठी झुंबड केली आणि शेअरचा भाव मूळ किमतीच्या तब्बल ८२ टक्क्यांनी वधारत प्रति शेअर १३९ रुपयांपर्यंत पोचला. बाजारातील भांडवली मूल्याचा विचार केला तर झोमॅटोनं एक लाख कोटी रुपयांचा पल्ला पदार्पणाच्या दिवशीच पहिल्या काही तासांतच गाठला आहे. आयपीओ किंवा प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरची खरेदी केली त्यांची गुंतवणूक पहिल्याच दिवशी जवळपास दुप्पट झाली आहे. (हेही वाचा, Zomato IPO: झोमॅटो आयपीओला सुरुवात होताच तासाभरात रिटेल सेगमेंटचे ओव्हर सब्सक्रिप्शन)

झोमॅटो 9,375 कोटी रुपयांचा आयपपी घेऊन बाजारात आला होता. कोल इंडियाच्या 15,199.44 कोटी आयपीओनंतर देशातील हा सर्वात मोठा दुसरा आयपीओ होता. झोमॅटोने या रुपात एक इतिहास बनवला आहे. देशात सार्वजनिक होत असलेला हा पहिला मेगा स्टार्टअप आहे.

झोमॅटोचा आयपीओ 38.25 पटींनी सब्सक्राइब केला गेला. क्वालिफाइड इंस्टीट्यूशन बायर्ससाठी रिजर्व्ह भागांना 51.79 पटींनी सब्सक्राइब करण्यातआले. नॉन-इंस्टीट्यूशनल गुंतवणुकदारांचा हिस्सा 32.96 पटींनी सब्सक्राईब झाला.