(संग्रहित, संपादित प्रतिमा)

Ayodhya Ram Temple Entry: राम मंदिराच्या (Ram Temple) अभिषेकची तारीख निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहेत. आता या कार्यक्रमाची निमंत्रणेही पाठवली जात आहेत. अयोध्या येथील राम मंदिरात 70 हून अधिक व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याची यादीही तयार करण्यात आली आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर होणारी गर्दी पाहता राम मंदिर बांधकाम ट्रस्ट आपली तयारी वाढवण्यात व्यस्त आहे, अशा परिस्थितीत गरजा, सुविधा, सुरक्षा आणि सुरळीत व्यवस्था याबाबत बैठका घेऊन निर्णय घेतले जात आहेत.

गाझियाबादच्या दुधेश्वर वेद विद्यापीठाचा विद्यार्थी मोहित पांडे हे अयोध्येतील राम मंदिराचे पुजारी असतील. राम मंदिराचे पुजारी म्हणून मोहित पांडे यांची निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहितने सात वर्षे शिक्षण घेतले आणि तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमशी संलग्न असलेल्या श्री व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. यानंतर 2023 मध्ये मोहित पांडेने सामवेदाचा अभ्यास करून पदव्युत्तर पदवी मिळवली. (हेही वाचा: Rajasthan New CM: भजनलाल शर्मा होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, वसुंधरा राजे यांचा पत्ता कट)

दुसरीकडे, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांनी श्री रामजन्मभूमी मंदिरात दर्शनासाठी कसे प्रवेश करावे आणि बाहेर पडताना त्यांना प्रसाद कोठे मिळेल याचा निर्णय श्री राम मंदिर ट्रस्टने घेतला आहे. मंदिर निर्माण समिती आणि श्री राम मंदिर ट्रस्टच्या दोन दिवसीय बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा म्हणाले की, सिंहद्वार उघडताच पूर्व दिशेकडून प्रवेश करणाऱ्या लोकांच्या डोळ्यासमोर देवाची मूर्ती असेल. दर्शन घेताना लोक 320 फूट आत प्रवेश करतील आणि देवासमोर डोके टेकवून डावीकडे वळून बाहेर पडतील आणि भिंतीजवळ आल्यावर त्यांना तेथे प्रसाद मिळेल. मग त्यांना जिथे जायचे असेल तिथे जाता येईल.

दरम्यान, आठ एकरांच्या उद्यानात उभारण्यात येणाऱ्या या मंदिरात 161 फूट उंच शिखरासह पाच उपशिखर असतील. तीन मजली मंदिर डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, परंतु ज्या मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, त्या मंदिराचा तळमजला पूर्णपणे तयार आहे. तळमजल्याची रचना तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे. आता त्याला अंतिम टच देण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आहे.