WPI Inflation (Pic Credit: IANS)

भारतामध्ये महागाईचा आलेख चढताच असल्याचं चित्र आहे. मे महिन्यात भारतात महागाईचा दर (WPI inflation) आता नव्या उच्चांकावर पोहचला आहे. एप्रिल महिन्यात 15.08% असलेली महागाई आता 15.88% वर पोहचली आहे. दरम्यान हा मागील 10 वर्षामधील उच्चांकी स्तर आहे. इंधन, मेटल, केमिकल आणि अन्न धान्याच्यांच्या किंमतींमधील वाढीमुळे महागाईचा दर वाढल्याचं सरकारी माहितीमधून समोर आली आहे.

देशात मागील 14 महिन्यांपासून सातत्याने हा महागाई दर 10% पेक्षा अधिक नोंदवण्यात आला आहे. हा घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर आहे. सध्या किरकोळ महागाई मध्ये थोडी घसरण पहायला मिळाली आहे. किरकोळ महागाईचा दर एप्रिल महिन्यात 7.79 % होता तो आता 7.04% झाला आहे.

भाजीपाल्याच्या किंमती 56.36% वाढल्या आहेत. तर गव्हाच्या किंमती 10.55% वाढल्या आहेत. मासे, मांसाहार, अंड्यांच्या किंमतीमध्ये 7.78% वाढ बघायला मिळाली आहे. इंधन आणि उर्जेच्या दरात 40.62% महागाई वाढ नोंदवली गेली आहे. ऑईल सीडस मध्ये 7.08% वाढ झाली आहे. क्रुड ऑईल पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसच्या किंमतींमध्ये 79.50% वाढ नोंदवली गेली आहे.

मे महिन्यात किरकोळ महागाई दर 7.04 टक्के होता, जो सलग पाचव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या महागाई लक्ष्यापेक्षा जास्त राहिला आहे.

आपल्या वार्षिक अहवालात, RBI ने म्हटले आहे की उच्च औद्योगिक कच्च्या मालाच्या किमती, वाहतूक खर्च आणि जागतिक रसद आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे होणारा कॉस्ट पुश प्रेशर मूळ चलनवाढीवर प्रभाव टाकत आहे.