देशातील अनेक शहरांमधील रहदारीची (Traffic) समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पावसाळ्यात तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. अशात देशाची राजधानी दिल्ली (Delhi) हे देशातील सर्वात वाईट रहदारीचे शहर (Worst Traffic In The World) ठरले आहे. मात्र ट्रॅफिक जॅम ही दिल्लीतच नाही तर जगभरात मोठी समस्या आहे. नुकतीच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील सर्वात खराब रहदारी असलेल्या शहरांची यादी शेअर केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीतील टॉप 10 शहरांमध्ये भारतातील एकूण तीन शहरांचा समावेश आहे.
या यादीत भारताची राजधानी दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीची ही स्थिती कायम आहे. मे 2023 मध्ये जाहीर झालेल्या यादीतमध्ये देखील दिल्लीचा समावेश टॉप 10 सर्वात वाईट रहदारीच्या शहरांमध्ये करण्यात आला होता. या यादीमध्ये दिल्लीनंतर आठव्या क्रमांकावर कोलकाता आणि दहाव्या क्रमांकावर मुंबई हे शहर आहे. (हेही वाचा: Road Accident in India: धक्कादायक! रस्ते अपघातात दर तासाला 18 भारतीयांचा मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक अपघात; नितीन गडकरींनी दिली माहिती)
अनेक अहवालांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, जगभरात अशी अनेक शहरे आहेत जिथे खराब वाहतूक व्यवस्थेमुळे ट्रॅफिक जाम होतात आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एकूण 236 शहरांची यादी जाहीर केली आहे, ज्या ठिकाणी सर्वात जास्त ट्रॅफिक जामची समस्या आहे.
Cities with the worst traffic in the world:
1. Lagos 🇳🇬
2. Los Angeles 🇺🇸
3. San Jose 🇨🇷
4. Colombo 🇱🇰
5. Dhaka 🇧🇩
6. Delhi 🇮🇳
7. Sharjah 🇦🇪
8. Kolkata 🇮🇳
9. Guatemala City 🇬🇹
10. Mumbai 🇮🇳
.
11. Mexico City 🇲🇽
13. San Francisco 🇺🇸
16. Bangalore 🇮🇳
17. Jakarta 🇮🇩…
— World of Statistics (@stats_feed) July 25, 2023
पहा जगातील सर्वात खराब रहदारी असलेली टॉप 20 शहरे-
- लागोस
- लॉस एंजेलिस
- सॅन जोस
- कोलंबो
- ढाका
- दिल्ली
- शारजाह
- कोलकाता
- ग्वाटेमाला सिटी
- मुंबई
- मेक्सिको सिटी
- सॅन फ्रान्सिस्को 🇺🇸
- बंगलोर
- जकार्ता
- कैरो
- इस्तंबूल
- साओ पाउलो
या यादीमध्ये शेवटच्या पाच शहरांमध्ये स्टॉकहोम, ओस्लो, रॉटरडॅम, झुरिच आणि व्हिएन्नाचा समावेश आहे.
दिल्लीच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाले तर, माहितीनुसार, खराब वाहतूक व्यवस्थेमागील एक प्रमुख कारण म्हणजे दिल्लीच्या रस्त्यांवर वाहनांची जास्त संख्या. एका संशोधनात असे दिसून आले आहे की दिल्लीतील वाढत्या प्रदूषण आणि रहदारीमागे वाहनांची संख्या, रस्त्यांचे जाळे आणि खराब इंधन इत्यादी अनेक कारणे आहेत. ज्या भागात कार्यालये आणि व्यवसाय सुरू आहेत, त्या भागात सर्वाधिक जाम दिसत आहे.