Passenger Molests Woman In Flight: फ्लाइटमध्ये पुन्हा एकदा विनयभंगाची घटना समोर आली आहे. चेन्नई पोलिसांनी (Chennai Police) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्ली-चेन्नई फ्लाइट (Delhi-Chennai Flight) मध्ये एका महिलेचा विनयभंग (Molestation) करण्यात आला. या घटनेतील आरोपी प्रवाशाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. त्याचे वय 43 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, दिल्ली-चेन्नई इंडिगो विमानात (Delhi-Chennai Indigo Flight) एका महिला प्रवाशाचा विनयभंग झाला. महिलेच्या तक्रारीनंतर या प्रवाशाला अटक करण्यात आली. या संदर्भात एअरलाइन्सकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
आरोपी मार्बल आणि फरशा बसविण्याचे काम करतो, असे सांगितले जाते. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली, ज्यामध्ये महिलेने आरोप केला आहे की, राजेश शर्मा नावाचा प्रवासी फ्लाइटमध्ये प्रवास करत होता. तो फ्लाइटमध्ये महिलेच्या शेजारी बसला होता. यादरम्यान त्याने महिलेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. विरोध करूनही हे कृत्य सुरूच राहिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. (हेही वाचा -Girls Beat ST Bus Conductor With Slippers: रत्नागिरीत 2 विद्यार्थिनींनी एसटी बस कंडक्टरला केली चप्पलने मारहाण; मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप (Watch Video))
त्यानंतर महिलेने क्रू मेंबरकडे प्रवाशाबाबत तक्रार केली. विमान गंतव्यस्थानी पोहोचताच आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली. विमानात महिलेचा विनयभंग करण्याची ही पहिलीचं घटना नाही. यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. (हेही वाचा - Molestation of Woman Passenger In BEST Bus: रिक्षा नंतर आता धावत्या बेस्ट बसमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार, 5 दिवसांनी आरोपी पोलीसांच्या अटकेत)
दरम्यान, वाराणसी विमानतळावरही अशीच विनयभंगाची घटना घडली होती. येथे एअर होस्टेसचा विनयभंग केल्याप्रकरणी एका प्रवाशाला फ्लाइटमधून बाहेर काढण्यात आले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना 30 ऑगस्ट रोजी वाराणसीहून हैदराबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये घडली होती.