Statue Of Unity ला पोहचण्यासाठी पश्चिम रेल्वे उभारणार नवं स्टेशन
स्टॅच्यू ऑफ युनिटी (Photo Credit- PTI)

जगातील सर्वात उंच प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ला (Statue Of Unity) पोहचणे सोयीस्कर व्हावे म्हणून पश्चिम रेल्वे केवडियाजवळ नवं स्टेशन उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. हे नवं रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असणार आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट देण्यासाठी कसे पोहचाल आणि काय आहेत तिकीट दर ?

15 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या हस्ते या नव्या रेल्वे स्टेशनचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यावेळी गुजरातचे पंतप्रधान विजय रुपाणी (Gujarat Chief Minister Vijay Rupani) आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) देखील उपस्थित असणार आहेत. केवडिया रेल्वे स्टेशन उभारण्यासाठी सुमारे 20 कोटींचा खर्च येणार आहे. हे रेल्वे स्टेशन 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'पासून केवळ 5 किलोमीटरच्या अंतरावर असेल, अशी माहित पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पहिल्या दिवसापासून ग्रीन बिल्डींग सर्टीफिकेशन प्राप्त झालेली भारतातील पहिली इमारत असेल. यामुळे पर्यटनाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल, असे पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते रविंद्र भास्कर यांनी सांगितले. Statue Of Unity पाहण्यासाठी पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी, शनिवारी २७,००० लोकांनी पहिला पुतळा

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या स्मृतीप्रिर्थत्य 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ची निर्मिती करण्यात आली. जगातील या सर्वात उंच प्रतिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ऑक्टोबरमध्ये उद्घाटन करण्यात आले.