'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे अनावरण : भारतीयांसाठी हा क्षण ऐतिहासिक आणि प्रेरणादायी- नरेंद्र मोदी
स्टॅच्यू ऑफ युनिटीचे अनावरण करताना पंतप्रधान मोदी (Photo Credit : ANI)

जगातील सर्वात उंच पुतळ्याचे सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी या पुतळ्याच्या निर्मितीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची एक चित्रफित दाखवण्यात आली. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 143 वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत आज या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. सरदार पटेल यांचे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक असून त्याची उंची 182 मीटर आहे.

आजचा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा क्षण भारतीयांसाठी अतिशय ऐतिहासिक आणि प्रेरणादायी आहे. मी अतिशय भाग्यवान आहे की मला हा स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार साहेबांना अर्पण करता आला. असे मोदी अनावरण सोहळ्यात बोलत होते.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि देशाच्या जडणघडणीत सरदार वल्लभभाई पटेलांचे फार मोठे योगदान आहे. त्यांना लोहपुरूष म्हणून ओळखलं जातं.

Events like today are very very important in a country's history and such events are difficult to erase. It is a historic and inspiring occasion for all Indians. I am fortunate to dedicate this statue of Sardar Sahab to the nation: PM Modi at the inauguration of #StatueOfUnity pic.twitter.com/fa4b7bmA10

— ANI (@ANI) October 31, 2018

हा पुतळा वडोदराजवळच्या नर्मदा जिल्ह्यात असलेल्या सरदार सरोवर बांधावर उभारण्यात आला आहे. नर्मदा नदीच्या खोऱ्यात केवडियामध्ये पुतळ्याच्या परिसरात जय्यत तयारी करण्यात आली होती.