Weather Update: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात 'Tej' आणि 'Hamoon' दुर्मिळ दुहेरी चक्रीवादळ
Cyclone (Photo Credits: Pixabay)

अरबी समुद्रात (Arabian Sea) चक्रीवादळ 'तेज' (Cyclones Tej) आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ 'हॅमून' (Cyclone Hamoon) या दुहेरी चक्रीवादळांची निर्मिती सुरू झाली आहे. समुद्रामध्ये असामान्य हवामान बदल घडल्याने दुहेरी चक्रीवादळांची ही घटना दुर्मिळ आणि लक्षणीय आहे. या आधी अशा प्रकारची शेवटची घटना पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये घडली होती. चक्रीवादळ 'तेज' सध्या येमेन आणि ओमानच्या किनारपट्टीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, तर चक्रीवादळ 'हॅमून' बंगालच्या उपसागरावर परिणाम करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम होऊन भारतामध्ये विविध राज्यांमध्ये पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या बुलेटिननुसार, बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सोमवार (24 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळ पूर्णपणे तयार झाल्यानंतर, दुसऱ्या चक्रीवादळाला इराणने ठेवलेले 'हॅमून' असे नाव दिले जाईल. समुद्रातील कमी दबाबाचे क्षेत्र सध्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पाहायला मिळत आहे. जे रविवारी रात्री ईशान्येकडे सरकले आहे. हे सध्या ओडिशातील पारादीपपासून अंदाजे 400 किमी अंतरावर आणि पश्चिम बंगालमधील दिघाच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 550 किमी अंतरावर आहे.

बंगालच्या उपसागरातील खोल दाबाचे झपाट्याने चक्रीवादळात रूपांतर झाले असून त्याला इराणने 'हॅमून' असे नाव दिले आहे. गेल्या सहा तासांत, प्रणालीने उत्तरेकडे 14 किमी प्रतितास वेगाने प्रवास केला आणि चक्रीवादळाची तीव्रता वाढवली. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत, चक्रीवादळ ओडिशातील पारादीपच्या किनाऱ्यापासून अंदाजे 230 किमी अंतरावर, पश्चिम बंगालमधील दिघापासून 360 किमी दक्षिणेस आणि बांगलादेशातील खेपुपाराच्या दक्षिण-नैऋत्येस 510 किमी अंतरावर होते.

आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 12 तासांत उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे. ही प्रणाली बांगलादेशच्या किनारपट्टीवर लँडफॉल करेल असा अंदाज आहे. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता खेपुपारा आणि चितगाव दरम्यान स्थिती अशीच कायम राहण्याची शक्यात आहे.

हवामानाच्या अंदाजांमध्ये मिझोराममध्ये एकाकी मुसळधार पावसासह बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच, 24 ऑक्टोबर रोजी त्रिपुरामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, 25 ऑक्टोबर रोजी त्याच प्रदेशात हळूहळू कमी होऊन वेगळ्या मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. 26 ऑक्टोबर रोजी पावसाची तीव्रता, प्रदेशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल.

शिवाय, 24-25 ऑक्टोबर रोजी दक्षिण आसाम आणि पूर्व मेघालयात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, दक्षिण आसाममध्ये अचानक मुसळधार पाऊस पडेल. दुसरीकडे, ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 24 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये 24 ऑक्टोबर रोजी किनारपट्टीच्या भागात एकाकी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.