Wardha Crime: धक्कादायक! सख्या भावाकडून धाकट्या बहिणीवर अत्याचार, पीडिता 6 महिन्यांची गर्भवती राहिल्यानं घटना उघड
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

वर्ध्यात (Wardha) बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी  घटना घडली आहे. अंगावर काटा उभा राहिल अशी घटना एका कुटुंबात घडली आहे. अल्पवयीन मुलीवर तिच्या स्वत:च्या थोरल्या भावानेचं अत्याचार केल्याचील बाब पुढे आली आहे. पीडिता 6 महिन्यांची गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. संबंधीत घटनेनंतर या भावंडाच्या पालकांना (Parents) मोठा धक्का बसला आहे. तरी वर्धा पोलिसांकडून (Wardha Police) आरोपी (Culprit) म्हणजे पिडीतेच्या संख्या भावावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  धक्कादायक बाब म्हणजे पिडीता आणि आरोपी हे दोघही अल्पवयीन आहे आणि अगदी न कळत्या वयांत अस काही होणं ही बाब पालकांसाठी अत्यंत चिंताजनक आहे.

 

आई वडिल कामानिमित्त बाहेर गेले असता भावाने आपल्या धाकट्या बहिणीसोबत हे गैरकृत्य केलं. काही महिन्यानंतर पीडित मुलीची प्रकृती बिघडली आणि तिच्या पोटात दुखत असल्यानं पालक तिला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital Sewagram) घेवून गेलेत. त्यावेळी डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकुन पिडीतेच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी (Doctor) तुमची मुलगी ६ महिन्याची गर्भवती असल्याचं सांगितलं आणि घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली . त्यानंतर कुटुंबियांनी वर्धा पोलिस ठाणे (Wardha Police Station) गाठत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. (हे ही वाचा:-Crime: संशयातून पती नेहमी करायचा मारहाण, आईच्या मदतीने केली हत्या, पत्नीसह सासू अटकेत)

 

पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने सुरुवातील काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. पिडीता घडलेला सगळा प्रकार सांगण्यास खुप घाबरत होती. त्यामुळे पोलिसांनी  हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे देण्यात आले.त्यानंतर पिडीतेचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन पिडीतेने तिच्या सख्या भावानेचं ही कृत्य केलं असल्याची गंभीर बाब स्पष्ट केली. पीडितेची साक्ष घेतल्या नंतर वर्धा शहर पोलिसांकडून पिडीतेच्या सख्या भावा विरुध्द तक्रार दाखल करण्यात आली. तसेच पॉक्सो कायद्यानुसार (POCSO Act) पीडितेच्या भावाला म्हणजे आरोपीला वर्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं.