Traffic (Photo Credit- PTI)

देशभरातील वाहन विक्री व्यवसायात एप्रील (2023) महिन्यात साधारण 4% घट दिसून आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) द्वारा नुकतीच वाहन विक्रीसंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार तीनचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ पाहाला मिळाली. खास करुन तीनचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये 57% ची वार्षिक सकस वाढ पाहायला मिळाली. मात्र, दुचाकी, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या विक्रीत मात्र घट पाहायला मिळाली

एफएडीए (FADA) च्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात एकूण वाहनांच्या किरकोळ विक्रीत 4% ची घट झाली असून दुचाकी आणि प्रवासी वाहने प्रत्येकी 7% आणि 1% ची घट झाली आहेत. दरम्यान, FADA ने GST कौन्सिलला दुचाकींवरील GST 28% वरून 18% पर्यंत कमी करण्याबाबत विचार करण्यास सांगितले आहे. ज्यामळे दुचाकी विक्रीमध्ये पुनरुज्जीवन करण्यात मदत होईल, कारण ही विक्री (दुचाकी) एकूण वाहन विक्रीच्या 75% चे प्रतिनिधित्व करते.

वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे की, एप्रिलमध्ये एकूण वाहन विक्रीत किरकोळ 4% घसरण दिसून आली. जी आर्थिक वर्ष 2024 सुरुवात सुरुवात संथ होईल असे दर्शवते. 3-व्हीलरमध्ये 57% ची निरोगी वार्षिक वाढ दिसून आली. तर ट्रॅक्टर आणि CV मध्ये अनुक्रमे 1% आणि 2% ची किरकोळ वाढ दिसून आली. (हेही वाचा, Air India- Vistara Partnership: एअर इंडिया आणि विस्तारा यांच्यात भागीदारी; भारतातील दोन महत्त्वाच्या विमान कंपन्या करणार सोबत काम)

ट्विट

दरम्यान, एफए़डीएच्या आकडेवारीनुसार, ट्रॅक्टर आणि CV मध्ये अनुक्रमे 1% आणि 2% ची किरकोळ वाढ झाली आहे. दुचाकी आणि प्रवासी वाहनांना धक्का बसला आहे. एंट्री-लेव्हल टू-व्हीलर सेगमेंट संघर्ष करत आहे.