भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत असल्याची तक्रार काही महिन्यांपासून होत आहे. आता देशातातील महागाई (Inflation Rate) दर नोव्हेंबरमध्ये वाढून 5.54 टक्क्यांवर गेला आहे, जो तीन वर्षांतीन सर्वोच्च आहे. अन्नधान्य गोष्टींमध्येही महागाईची नोंद झाली आहे, तसेच भाजीपाला 35.99 टक्के महाग झाला आहे. अलीकडेच कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली, देशातील बर्याच ठिकाणी कांद्याची किंमत दीडशे रुपयांच्या गेली आहे. ऑक्टोबरमध्ये महागाई दर 4.62 टक्के होता. एका वर्षापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये हा दर 2.33 टक्के होता. जुलै 2016 मध्ये हाच महागाई 6.07 टक्के नोंदविण्यात आला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये अन्नधान्य महागाई दर 10.01 टक्क्यांवर गेला आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर 7.89 दर टक्के होता. एक वर्षापूर्वी नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किंमती 2.61 टक्क्यांनी घसरल्या होत्या. विशेष म्हणजे किरकोळ महागाई चार टक्के राखण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेला देण्यात आली आहे. या महिन्यात कांद्याच्या वाढत्या दरामुळे भाजीपाला 35.99 टक्क्यांनी महागला आहे. ऑक्टोबरमध्ये भाजीपाला 26.10 टक्के महाग झाला होता. (हेही वाचा: घरगुती गॅसनंतर आता अन्नधान्यांंच्या किंमती वाढल्या, तुरडाळ झाली 120 रु. किलो; गेल्या 7 महिन्यांतली सर्वात जास्त महागाई)
या काळात मांसाहारी गोष्टींची महागाई 9.38 टक्के वाढली. तर डाळी आणि संबंधित वस्तूंच्या किंमतींमध्ये 13.94 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन आणि वीज महागाईचा दर 1.93 टक्के होता. रेटिंग एजन्सी इकराच्या मते, डिसेंबर 2019 मध्ये महागाईचा दर आणखी 5.8-6 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. इकरा म्हणाले की, नुकत्याच दूरसंचार दरात वाढ झाल्यामुळे डिसेंबरमध्ये महागाईचा दर आणखी वाढू शकेल. त्यामुळे रिझर्व्ह बँक फेब्रुवारी 2020 च्या पुनरावलोकनात मुख्य व्याज दर अबाधित ठेवेल अशी अपेक्षा आहे.