घरगुती गॅसनंतर आता अन्नधान्यांंच्या किंमती वाढल्या, तुरडाळ झाली 120 रु. किलो; गेल्या 7 महिन्यांतली सर्वात जास्त महागाई
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

सध्या इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीने जनता त्रासलेली असताना, मोदी सरकारच्या काळात महागाई दर (Inflation Rate) 3.05 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या किंमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या सात महिन्यांत हा सर्वात उच्च महागाई दर आहे. यामध्ये धन्न्यांच्या किंमती सर्वात जास्त वाढल्या आहेत. दिल्लीच्या घाऊक बाजारात तुरीच्या डाळीची किंमत 100 ते 120 रुपये किलोवर गेली आहे. आता यावर्षीच्या पावसावर महागाई दारामध्ये होणारी चढ उतार अवलंबून आहे.

वाढलेला/कमी झालेला महागाई दर-

  • सध्या भाज्यांचे दरही कडाडलेले दिसत आहेत. भाज्यांचा महागाई दर 2.87 टक्क्यांवरून 5.46 टक्क्यांवर पोहचला आहे.
  • मे महिन्यात विजेचा दर घटून 2.56 टक्क्यांवरून 2.48 टक्क्यांवर आला आहे.
  • कपडे व फुटवेअरची किंमत एप्रिलमध्ये 2.01 टक्क्यांवरून 1.8 टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत.
  • औद्योगीत क्षेत्राची चांगली प्रगती होत आहे. औद्योगिक उत्पादनाचा दर 0.1 वरून 3.4 टक्क्यांवर गेला आहे, ज्याचा परिणाम देशाच्या आर्थिक स्थितीवर होईल.
  • कडधान्ये सर्वात जास्त महाग झाली आहेत. मे मध्ये डाळींचा महागाईचा दर 0.88 टक्क्यांवरून 2.13 टक्के इतका वाढला आहे.

(हेही वाचा: घरगुती सिलिंडरच्या किंमती वाढल्या; LPG Gas तब्बल 25 रुपयांनी महागला)

सध्या देशात काही प्रमाणात कडधान्यांचा साठा आहे मात्र तरी सरकारने आफ्रिकेतल्या मोझाम्बिक देशातून 1.75 लाख टन तूरडाळ आयात करण्याची परवानगी दिली आहे. अचानक डाळींच्या किंमती कशा वाढल्या याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. याआधी 2015 मध्ये तूरडाळीचा दर 200 रुपये किलोवर गेला होता.