Domestic Violence | Pixabay.com

पुरोगामी विचारांचा वसा जपणार्‍या महाराष्ट्र राज्यामध्ये आजही सुशिक्षित घरात हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना समोर येणं हे प्रगतीचं लक्षणं नाही. वैष्णवी हगवणे च्या मृत्यू प्रकरणानंतर मूळशी तील प्रतिष्ठीत हगवणे कुटुंबाचा काळा चेहरा आणि क्रुर मानसिकता समोर आली आहे. एकाच कुटुंबातील दोन सूना कौटुंबिक अत्यचाराचा जाच सहन करत होत्या. मयुरी जगताप हगवणे ने देखील सासरच्या मंडळींकडून मारहाण, मानसिक त्रास होत असल्याची पोलिस तक्रार केली आहे. वैष्णवीने देखील अत्याचार होत असल्याचं तिच्या माहेरी सांगितलं होतं.वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबाने केलेल्या काही मागण्या पूर्ण केल्या पण जमिन खरेदीसाठी पैसे देऊन न शकल्याने होणारा त्रास असह्य झाल्याने दबावाखाली येऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. वैष्णवीच्या पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये ही हत्या किंवा आत्महत्या असू शकते असं म्हटलं आहे. त्यामुळे आता पोलिस तपासामधून पुढील गोष्टींचा उलगडला होईल. Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फरार सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना अटक .

दरम्यान वैष्णवीचा सासरा हा एनसीपी पक्षाचा कार्यकर्ता होता. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे पुण्याच्या मुळशी तालुक्याचा माजी तालुकाध्यक्ष होता.या प्रकरणानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज मीडीयाशी बोलताना अजित पवारांनी लग्न करून सासरी जाणार्‍या मुलींना या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सल्ला दिला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नववधूंना अजित पवारांचा सल्ला काय?

अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणाशी आपला दुरान्वये संबंध नाही. पण वैष्णवीने एकदा संपर्क साधला असता तरीही यामध्ये काही करता आलं असतं असं म्हणताना आता नववधू म्हणून सासरी जाणार्‍या मुलींना सल्ला दिला आहे. 'मुलींना सासरी हुंडा किंवा कौंटुबिक अत्याचाराचा होत असल्यास पोलिसांत तक्रार करण्याचे' आवाहन केले आहे.

सुप्रिया सुळे यांचा 'हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब' चा एल्गार

हुंडा आणि कौंटुबिक अत्याचारामध्ये कुठे तक्रार कराल?

महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेला (POUA), महिला व बाल विकास विभाग, पोलीस स्टेशन किंवा राष्ट्रीय महिला आयोगा कडे तक्रार केली जाऊ शकते.

  • राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाईन नंबर- 1800-180-5220
  • महाराष्ट्र राज्य महिला आयोग - (०२२) २६५९२७०७
  • महाराष्ट्र राज्य महिला आयोग हेल्पलाईन नंबर- १५५२०९
  • हिंंसाचार प्रकरणी तक्रार  - 7827170170
  •  Women Helpline Number -  112

महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक जिल्‍हयामध्‍ये जिल्‍हा दक्षता कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिस अधीक्षकांच्या ऑफिसच्या ठिकाणी (एसपी ऑफिस) महिला समुपदेशन केंद्र तसेच महिला तक्रार निवारण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ज्या काही पीडित महिला त्यांचा अर्ज तक्रार निवारण केंद्र, समुपदेशन केंद्र, तालुक्याच्या ठिकाणी संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे त्यांच्याकडे देऊ शकते.

दरम्यान हुंडा आणि कौटुंबिक अत्यचार प्रकरणामध्ये महिलेला पती, सासरची मंडळी यांच्याविरूद्ध तक्रार करू शकते. महिला अविवाहित किंवा एकटी असेल तर तिला माहेरच्यांकडून त्रास होत असेल तरीही ती (वडील, भाऊ) यांच्या विरूद्धही तक्रार करू शकते. पीडीतेच्या जागी तिच्या जवळच्या व्यक्तींनाही तक्रार दाखल करण्याची मुभा आहे.