Arrest | Pixabay.com

वैष्णावी हगवणे (Vaishnavi Hagawane) मृत्यू प्रकरणी अखेर फरार सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशील हगवणे (Sushil Hagawane) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मावळ मध्ये त्यांना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास हागवणे पिता-पुत्रांना ताब्यात घेण्यात आले आहे.बावधन पोलिस स्टेशनच्या टीमने ही कारवाई केली आहे. जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते न दिल्याने सून वैष्णवी ला शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी यापूर्वीच पती, सासू व नणंद यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. 16 मे दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली आहे. आज वैष्णवीच्या निधनानंतर सात दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीच्या प्रकरणानंतर समाजात संताप व्यक्त होत असताना पोलिसांच्या टीम हगवणे कुटुंबाच्या मागावर होत्या. सीसीटीव्ही फूटेज मध्ये पिता-पुत्र हॉटेल मध्ये जेवताना दिसले. त्यावरून पोलिसांनी पुढील कारवाई केली आणि त्यांना बेड्या ठोकल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांना या प्रकरणी कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. काल वैष्णवीचं बाळ देखील त्यांच्या घरी सुखरूप परतले आहे. कस्पटे कुटुंबाकडे त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नक्की वाचा: Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे चं 9 महिन्यांचं बाळ तिच्या आई-वडीलांकडे सुपूर्त .

राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला अटक

राजेंद्र हगवणे यांची मोठी सून देखील कौटुंबिक अत्याचाराची बळी ठरली आहे. तिने देखील हगवणे कुटुंबाकडून त्रास दिला जात असल्याची माहिती दिली आहे. तिने देखील यापूर्वी अनेकदा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र राजकीय दबावाखाली पोलिस हगवणेंवर कारवाई करत नसल्याचं तिचाही दावा आहे.

दरम्यान राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांची एनसीपी मधून कालच हकालपट्टी केल्याची माहिती देण्यात आली आहे. दोघेही एनसीपी मध्ये कोणत्याही पदावर नव्हते.