
पुण्यामध्ये मुळशीत राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने लग्नाच्या दोन वर्षातच कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणेचं (Vaishnavi Hagawane) हे मृत्यू प्रकरण हादरवणारं आहे. 16 मे दिवशी वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचे सासरे आणि दीर फरार आहेत तर पती शशांक, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर आता तिचं 9 महिन्यांचं बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्यात आले आहे. बाणेरच्या हायवे वर अज्ञातांकडून वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे म्हणजे कस्पटे कुटुंबाकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दाखल घेत पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना फोन करून या प्रकरणात इतर कारवाई होत असताना तिचं 9 महिन्यांचं बाळ कुठे आहे, याचा तातडीने शोध घ्या आणि ते आईच्या कुटुंबीयांना सुपूर्द करा, अशी विशेष सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी दिली होती. असं समोर आलं आहे. Vaishnavi Hagawane Death Case: अजित पवार यांचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे पक्षातून बडतर्फ; सून वैष्णवी च्या आत्महत्येनंतर फरार .
वैष्णवीचं बाळ कस्पटे कुटुंबाकडे
View this post on Instagram
वैष्णवी कस्पटेचा शशांक हगवणे सोबत 2023 मध्ये प्रेम विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर पतीने चारित्र्यावर संशय घेतला. हगवणे कुटुंबाकडूनही मारहाण, पैशांची मागणी होत राहिली. वैष्णवीच्या पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही घटना घडू शकतात, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Women and Child Helpline Numbers: Childline India – 1098; Missing Child and Women – 1094; Women’s Helpline – 181; National Commission for Women Helpline – 112; National Commission for Women Helpline Against Violence – 7827170170; Police Women and Senior Citizen Helpline – 1091/1291.