NCP

एनसीपी चे पदाधिकारी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या सूनेने कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर आता अजित पवारांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा दावा समोर आला आहे. सध्या या प्रकरणी वैष्णवी चे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा अटकेत आहे तर राजेंद्र हगवणे फरार आहेत. राजेंद्र हे अजित पवार यांचे पदाधिकारी आणि माजी तालुकाध्यक्ष आहेत.वैष्णवीच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर समाजाच्या सार्‍याच स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

ABP Majha च्या रिपोर्ट नुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष, सुरज चव्हाण यांनी राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती दिली आहे. यावेळी अजित पवारांनी सीपींशी बोलून आरोपींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.

राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांची हकालपट्टी

View this post on Instagram

A post shared by Sakal News (@sakalmedia)

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण काय आहे?

राजेंद्र हगवणे यांच्या 24 वर्षीय सून वैष्णवी हगवणे ने गळफास घेत आत्महत्या केली आहे. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी दिल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी काल फॉर्च्यूनर जप्त केली आहे. दरम्यान आनंद कस्पटे यांनी मुलीने आपल्याला सासरच्या लोकांकडून त्रास होत असल्याचं वारंवार सांगितलं होतं.असं म्हटलं आहे. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले आहेत.

Women and Child Helpline Numbers: Childline India – 1098; Missing Child and Women – 1094; Women’s Helpline – 181; National Commission for Women Helpline – 112; National Commission for Women Helpline Against Violence – 7827170170; Police Women and Senior Citizen Helpline – 1091/1291.