File image of MGNREGA workers (Photo Credits: MGNREGA website)

उन्नाव जिल्ह्यातील (Unnao District) कान्हौ (Kanhau) गावात नवीन पंचायत इमारतीचा पाया खोदताना, बुधवारी दुपारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी कायदा (MGNREGA) अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांनी, 19 व्या शतकातील चांदी (Silver) आणि कांस्य नाणी (Bronze Coins) असलेली घागर शोधून काढली. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. याच कान्हाऊ गावाजवळील उन्नावच्या दौंडिया खेडा येथे ऑक्टोबर 2013 मध्ये एका मोठ्या खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू होता. त्यानंतर सात वर्षानंतर हा शोध लागला आहे.

त्यावेळी शोभन सरकार यांनी असा दावा केला होता की, उन्नावच्या दौंडियाखेडा गावाजवळील रेवा नरेशच्या (Rao Ram Baksh Singh) किल्ल्यात शिव चबुतऱ्याजवळ 1000 टन सोने गाडले आहे. त्यांना ही गोष्ट स्वप्नात दिसली होती व सरकारने हे सोने बाहेर काढले पाहिजे असे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी सुमारे 15 दिवस या झाजीण्याचा शोध चालू होता मात्र तिचे काहीच सापडले नाही.

आता बुधवारी सापडलेली नाणी 1862 सालची असून, त्यांच्यावर त्या वर्षाची छाप आहे. उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), सफीपूर, राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, खोदकामावेळी 17 चांदी आणि 287 कांस्य नाणी सापडली असून, ती सफीपूरच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे. (हेही वाचा: न्नाव येथे 1000 टन सोन्याच्या खजिन्याचा दावा करणारे बाबा शोभन सरकार यांचे निधन; अंत्ययात्रेला गर्दी, Social Distancing चा उडाला फज्जा)

ही नाण्याची घागर सापडल्यानंतर कामगारांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. काही कामगारांनी त्यातील काही नाणी घेऊन तिथून पळ काढला. त्यादरम्यान कोणीतरी पोलिसांना याबाबत कळविले व त्यांनी छापा टाकला आणि कामगारांकडून नाणी जप्त करण्यात यश मिळविले. प्रसाद म्हणाले, ‘कामगारांकडे अजून काही नाणी असू शकतात, ती त्यांच्याकडून लवकरच मिळवली जातील.’

दरम्यान याआधी शोभन सरकार यांच्या दाव्याला सत्यात उतरत असताना, अनेकांनी या गोष्टीची चेष्टा केली होती. मात्र उत्खनन केल्यानंतर तिथे काहीच सापडले नव्हते. त्यावेळी या विषयावर बरेच राजकारणही झाले होते. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात ट्रेझरीच्या वितरणाबाबत वादही सुरु होते.