UP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

UP: देशात अद्याप कोरोनाची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील एका स्थानिक भाजपच्या नेत्याला कोरोनावरील लसीचे 5 डोस दिल्याचे प्रमाणपत्र दिले गेले आहे. तर सहावा डोस शेड्युअल दाखवला गेल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे.(Covid-19 Update in India: देशात मागील 24 तासांत 30,256 नव्या कोरोना रुग्णांची भर; 295 मृत्यू)

सारधाना परिसरातील रामपाल सिंग हे भाजपचे 79 विभागाचे अध्यक्ष आहेत. त्याचसोबत ते हिंदू युवा वाहिनीचे सदस्य असून त्यांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड केले. त्यामध्ये त्यांना दिसून आले की, 5 डोस दिल गेले असून सहावा डोस शेड्युल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरु केला.

सिंग यांनी असे म्हटले की, त्यांना लसीचा पहिला डोस मार्च 16 रोजी दिला होता. तर दुसरा डोस 8 मे रोजी दिला गेला. मात्र लसीकरणाच्या पोर्टलवरुन जेव्हा प्रमाणपत्र डाउनलोड केले असता त्यांना लसीचे पाच डोस दिल्याचे दाखवले गेले. तर सहावा डोस हा डिसेंबर 2021- जानेवारी 2022 दरम्यानचा दाखवला गेला. सिंग यांना पहिला डोस 26 मार्च, दुसरा डोस 8 मे, तिसरा मे 15, चौथा आणि पाचवा डोस 15 सप्टेंबरला दिल्याचे दाखवण्यात आले.(Corona Vaccine: लस घेण्यास नकार दिला म्हणून प्रशासनाकडून एका कुटुंबाचा वीज आणि पाणीपुरवठा खंडीत)

याबद्दल जेव्हा वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी अखिलेश मोहन यांना संपर्क साधला असता तेव्हा त्यांनी असे म्हटले की, एखाद्याने दोन वेळेपेक्षा अधिक वेळा लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले. प्रथमदर्शी असे वाटते की, हा गैरप्रकार असून कटकारस्थान वाटते. पोर्टल हॅक करुन कोणीतरी असा प्रकार केल्याचे वाटते.