भारतातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट पाहायला मिळत असून देशात लसीकरण मोहीम अधिक वेगाने सुरु आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बडवानी (Barwani) येथून धक्कादायक घटना उघडकीस आहे. कोरोना लस घेण्यास नकार दिला म्हणून प्रशासनाकडून एका कुटुंबाच्या घराची वीज खंडीत (Electricity) करण्यात आली. तसेच पाणी पुरवठाही (Water Supply) बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहिद खान यांच्या घरी अधिकाऱ्यांचे एक पथक शुक्रवारी आले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी त्यांना लस घेतली का नाही? अशी विचारणा केली. त्यावेळी आपल्यावर वैद्यकीय उपाचार सरु आहेत. तसेच येत्या 28 तारखेला आपण लस घेणार असल्याचे खान यांच्या कुटुबियांनी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांनी लस घेण्यासाठी खान यांच्या कुटुबियांवर दबाव टाकला. परंतु, कुटंबाने लस घेण्यास नकार दिल्याने प्रशासनाने पाणी आणि वीजपुरवठा तात्काळ बंद केला तसंच रेशन कार्डही जप्त केल्याचा आरोप या खान परिवाराने केला आहे. या संदर्भात आजतकने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Hyderabad Murder Case: निर्दयीपणाचा कळस! बापाने आपल्या 2 वर्षाच्या मुलाचा चिरला गळा, आरोपीचा शोध सुरू
दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी, यासाठी आम्ही प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहोत. यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. नागरिकांचाही याला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अजूनही काही लोक लस टोचून घ्यायला तयार नाहीत. अशावेळी थोडी सक्ती करावी लागते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.