Hyderabad Murder Case: निर्दयीपणाचा कळस! बापाने आपल्या 2 वर्षाच्या मुलाचा चिरला गळा, आरोपीचा शोध सुरू
Child (Photo Credits: Pixabay) Representational Image

हैदराबादमधून (Hyderabad) एक भयानक घटना उघडकीस आली आहे. जिथे एका व्यक्तीने निर्दयीपणे आपल्या नवजात मुलाचा गळा चिरून हत्या (Murder) केली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अहवालानुसार ही घटना लंगर हौजच्या प्रशांत नगरमधील त्यांच्या निवासस्थानी घडली आहे. हसीब असे आरोपीचे नाव आहे.  रिपोर्टनुसार तो माणूस आपल्या मुलाला पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याचा गळा कापला. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या (Police) तपशीलानुसार त्या व्यक्तीने गुन्हा केला आणि मुलाची आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच तो घर सोडून गेला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाने नमूद केले की, आरोपी बेरोजगार होता आणि त्याला काही आरोग्य समस्या होत्या.

पीडितेच्या वडिलांनी स्वयंपाकघरातून चाकू काढून मुलाला सोबत नेले. दोन वर्षांच्या मुलाच्या आईने आपल्या पतीचा हेतूंवर संशय घेत त्याच्यामागे गेली. पण जेव्हा ती पहिल्या मजल्यावर पोहचली. तेव्हा हसीबने आपल्या मुलाचा गळा कापून घर सोडले होते. अर्भकाच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा Karma Visarjan: कर्मा दल विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 7 मुलींचा तलावात बुडल्याने मृत्यू

या घटनेवर भाष्य करताना लंगर हौजचे पोलीस निरीक्षक के श्रीनिवास म्हणाले, आरोपी फरार आहे आणि त्यामुळे आम्हाला हत्येमागचा हेतू माहित नाही. पीडितेचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले, जिथे आरोपी रस्त्यावर फिरताना दिसला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी बेरोजगार आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे.

घटनेबद्दल तपशील देताना, पोलिसांनी सांगितले की त्या व्यक्तीने स्वयंपाकघरातील चाकूवर हात मिळवला आणि मुलाला सोबत घेतले. तो माणूस काहीतरी करेल या संशयाने त्याची बायको त्यांच्या मागे गेली पण खूप उशीर झाला होता. मुलाला रुग्णालयात हलवण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.