Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Seven girls Drowned In Jharkhand: झारखंडच्या लातेहारमध्ये (Latehar) मोठी दुर्घटना घडली आहे. कर्मा विसर्जनादरम्यान (Karma Visarjan) 7 मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (18 सप्टेंबर) दुपारी 12 च्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बालूमाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृत मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा कुमारी (वय, 18), लक्ष्मी कुमारी (वय, 8), रिना कुमारी (वय, 11), मीना कुमारी (वय, 8), पिंकी कुमारी (वय, 15), सुषमा कुमारी (वय, 7), सुनिता कुमारी (वय, 17) असे मृत मुलीचे नाव आहे. या सर्व मुली शेरेगडा गावातील मननडीह टोला येथील रहिवासी होत्या. या सर्व मुली तोरी-बाळूमठ-शिवपूर रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात कर्मा दल विसर्जनासाठी गेल्या होत्या. त्यापैकी दोन मुली खोल पाण्यात गेल्या आणि बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी इतर पाच मुलीही पाण्यात बुडल्या. हे देखील वाचा- Karnataka Suicide Horror: पाच मृतदेहांसोबत चक्क 5 दिवस राहिली अडीच वर्षाची चिमुकली, कर्नाटक येथील धक्कादायक घटना

लातेहारचे उपायुक्त अबू इम्रान म्हणाले की, गावातील 10 मुलींचा एक गट गावातच रेल्वे लाईन जवळील कृत्रिम तलावात गेले होते. सर्व मुलींचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृत झालेल्या सर्व मुली 12 ते 20 वयोगटातील होत्या. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य केल्यानंतर दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण घटनेची चौकशी उपायुक्त सुरेंद्र वर्मा करणार आहेत.