Karnataka Suicide Horror: पाच मृतदेहांसोबत चक्क 5 दिवस राहिली अडीच वर्षाची चिमुकली, कर्नाटक येथील धक्कादायक घटना
Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Family Commits Suicide: कर्नाटकच्या (Karnataka) बंगळुरु (Bengaluru) येथे एका 9 वर्षाच्या मृतदेह आणि कुटंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना बयादरहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आस्कमित मृत्युंची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या मृतदेहासोबत चक्क अडीच वर्षाची चिमुकली बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे. ही चिमुकली मृतदेहांसोबत चक्क पाच दिवस राहिल्याची माहिती समोर येत आहे.

प्रेक्षा असे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीचे नाव आहे. तर, तिची आई सिंचना (वय, 34), आजी भारती (वय, 51), आईची बहिण सिंधुराणी (वय, 31), आईचा भाऊ मधुसागर (वय, 25) यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्याचसोबत एका 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पलंगावर आढळून आला. घरातीलच एक सदस्य काही दिवसांनी बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हे देखील वाचा- Bangalore Suicide Case: बेंगळूरूमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याने वडिलांचा पिस्तूलाने डोक्यात गोळी घालून केली आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील एक सदस्य हलेगिरी शंकर बाहेरगावातून शुक्रवारी त्यांच्या घरी परतले. त्यावेळी त्यांना दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी बाहेरून अनेकदा आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी घराचा दरावाजा तोडला. तेव्हा त्यांना चार जणांचे मृतदेह घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याचवेळी ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पलंगावर होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.