देशात आत्महत्येचे (Suicide) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नुकतीच बेंगळूरूमधून (Bangalore) एक आत्महत्येचे घटनासमोर आली आहे. एका पीयूसी 12 वीच्या विद्यार्थ्याने (Student) शुक्रवारी पहाटे बेंगळुरू येथील बस स्टॉपजवळ (Bus Stop) वडिलांच्या पिस्तुलाने (Gun) डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल भंडारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो उत्तराखंडमधील (Uttarakhand) निवृत्त सैन्यदलाचा मुलगा होता. त्यांचे कुटुंब 20 वर्षांपासून बेंगळुरूच्या आरटी नगर परिसरात स्थायिक झाले होते. पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. कारण त्यांनी गोळी झाडल्याचा आवाज ऐकला आणि नंतर संजय नगर बस स्टॉपवर रक्ताच्या तळ्यात एक मृतदेह पडलेला दिसला. गोळी उजवीकडून त्याच्या डोक्यात घुसली आणि दुसऱ्या बाजूला बाहेर आली. हेही वाचा Rajasthan: धक्कादायक! 60 वर्षीय महिलेची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार; 19 वर्षीय आरोपीस पोलिसांकडून अटक
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच त्याच्या बॅग आणि पिस्तूलमधून गोळ्या जप्त केल्या. पिस्तुलाला त्याच्या वडिलांच्या नावाने परवाना देण्यात आला होता. तो घरी एका कपाटात ठेवण्यात आला होता. राहुल ज्याला अभ्यासात खूप चांगले म्हटले जाते. त्याला त्याच्या वडिलांनी पिस्तूल वापरण्याचे प्रशिक्षण दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजता अभ्यासासाठी उठलेला राहुल एका तासानंतर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता.
पॉकेटमनी म्हणून 500 रुपये न मिळाल्याने त्याने आपल्या वडिलांशी भांडण केले. त्यावरून त्याचे वडील त्याला ओरडले, असे पोलिसांनी सांगितले. मात्र त्यांनी आत्महत्येचे नेमके कारण अद्याप शोधले नसल्याचे सांगितले. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.