
राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका 19 वर्षे युवकाने एका वृद्ध महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात तो अपयशी ठरल्याने त्याने महिलेचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर नंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. ही घटना हनुमानगड जिल्ह्यातील पिलीबंगाची आहे. येथील दुलमाना गावात बुधवारी रात्री 19 वर्षांचा मुलगा दारूच्या नशेत एका वृद्ध महिलेच्या घरात घुसला. तेथे त्याने एका 60 वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही.
त्यानंतर तरुणाने स्वतःवरील नियंत्रण सुटले आणि त्याने वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने महिलेच्या पार्थिव शरीरावर बलात्कार केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी आरोपी तरुणाला ताबडतोब अटक केली. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
या महिलेचा दीर बनवारीलाल यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कलम 450, 376 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला विधवा होती. तिचा पती तीन वर्षांपूर्वी मरण पावला होता आणि त्यांना मूल नव्हते. यामुळे ती घरात एकटी राहत असे. कदाचित आरोपीला याच गोष्टीचा फायदा घ्यायचा होता. ही महिला पशुपालन करून गुजराण करत होती. (हेही वाचा: Hyderabad: 27 वर्षीय महिला केअरटेकरचे अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; न्यायालयाने सुनावली 20 वर्षांची शिक्षा)
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राजस्थानमध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्काराची प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नाहीत. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये राजस्थान सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार, वर्ष 2020 मध्ये राजस्थानमध्ये 5310 गुन्हे दाखल झाले आहेत. हे देशातील सर्वाधिक आहेत.