Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉक डाऊन (Lockdown) चालू होते. या महिन्याच्या सुरुवातील अनलॉक 1 (Unlock 1) द्वारे सरकारने त्यामध्ये शिथिलता आणली. आता गृह मंत्रालयाने अनलॉक-2.0 ची गाइडलाईन्स (Unlock-2.0 Guidelines) जारी केली आहे. ही मार्गदर्शक तत्वे 1 जुलै पासून लागू होतील. कंटेनमेंट झोनमधील (Containment Zones) निर्बंधित व्यवहार आणि निर्बंध वगळता, इतर सर्व प्रकारच्या निर्बंधांना सरकारने मान्यता दिली आहे. मात्र अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यातही मास्क घालणे, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल.

महत्वाचे म्हणजे, बुधवारपासून रात्रीच्या कर्फ्यूची वेळ कमी होणार आहे. बुधवारपासून कर्फ्यू रात्री 9 ऐवजी रात्री 10 वाजता सुरू होईल आणि नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता समाप्त होईल. हे लॉकडाउन 31 जुलैपर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये लागू राहील. गृहनिर्माण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कंटेंट झोनमध्ये केवळ आवश्यक कामांनाच परवानगी दिली जाईल.

जाणून घ्या काय सुरु व बंद असेल-

  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल, सिनेमे, जिम, तलाव, धार्मिक कार्यक्रम 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.
  • केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था, मानक ऑपरेटिंग प्रक्रियेअंतर्गत 15 जुलै 2020 पासून उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यावेळी, Department of Personnel & Training ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.
  • या कालावधीत प्रवाशांना गृह मंत्रालयाने आदेश दिलेल्या प्रवासाशिवाय इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
  • कोणत्याही सामाजिक/राजकीय/खेळ/करमणूक/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
  • डोमेस्टिक फ्लाईट्स आणि प्रवासी गाड्यांना यापूर्वीच मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. आता त्यांचे कार्य हळूहळू वाढविले जाईल. (हेही वाचा: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सायंकाळी 4 वाजता देशाला संबोधणार)या सर्व गोष्टी सुरु करण्याबाबत सरकार स्वतंत्रपणे नंतर निर्णय घेणार आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालय आणि त्यातील विभागांशी सल्लामसलत केल्यानंतर अनलॉक-2 मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान, आज केंद्राने अनलॉकचे नियम जाहीर करण्यापूर्वी  महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय राज्यात 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन घोषित केले आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू राज्यानेही असाच निर्णय घेतला आहे.