मार्चमध्ये भारतामध्ये कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रकरणे वाढायला सुरुवात झाल्यानंतर, केंद्र सरकारने देशात लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली होती. सध्या या लॉकडाऊनचा 5 वा टप्पा चालू आहे. अशात आता सरकारने यामध्ये काही नियम शिथिल करून नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. आता नागरिक रेस्टॉरंट्स, कामाची ठिकाणे, धार्मिक स्थाने अशांना भेटी देऊ शकणार आहेत. मात्र यामध्येही काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कंटेन्मेंट झोनमधील रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे बंदच राहतील, फक्त बाह्य कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी या गोष्टी उघडण्याची परवानगी दिली जाईल.
महत्वाचे म्हणजे 10 वर्षांखालील व 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, गर्भवती महिला घरातून बाहेर पडू शकणार नाहींत.
धार्मिक स्थळांबाबतचे नियम –
Persons above 65 years of age, persons with comorbidities, pregnant women, children below the age of 10 years are advised to stay at home: Ministry of Health and Family Welfare #Unlock1 https://t.co/gTVTn4S5Jm
— ANI (@ANI) June 4, 2020
- नागरिकांनी 6 फुटाचे अंतर पाळणे आवश्यक आहे व मास्कचा वापर करणे बंधनकार राहील.
- इतःस्तत थुंकण्यावर मनाई असेल. नागरिकांनी वेळोवेळी हात धुतले पाहिजेत व फोनमध्ये आरोग्य सेतू App डाउनलोड करावे.
- धार्मिक स्थळांमध्ये थर्मल चेकिंगची सोय असावी व ज्या लोकांमध्ये कोणतेही लक्षणे आढळण्र नाहीत त्यांनाच आता जाण्यास परवानगी असेल.
- मूर्तीला अथवा धार्मिक ग्रंथांना हात लावण्यास परवानगी नसेल.
- अशा ठिकाणी गीत, भजन किंवा तत्सम गोष्टींना परवानगी नसेल.
- धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद अथवा होली वॉटर देण्यास परवानगी नसेल.
कार्यालयातील नियम –
Union Ministry of Health and Family Welfare has issued Standard Operating Procedure to contain the spread of #COVID19 at workplaces. #Unlock1 pic.twitter.com/4kVLSZ6G8b
— ANI (@ANI) June 4, 2020
धार्मिक स्थळांच्या बाबतील लागू असलेले अनेक नियम कामाच्या ठिकाणीही लागू असतील. त्याव्यतिरिक्त –
- कंटेन्मेंट झोनमधील कर्मचारी घरातूनच काम करतील
- कार्यालयात बसण्याच्या जागी कर्मचाऱ्यांमध्ये ठराविक अंतर असणे गरजेचे आहे.
- लिफ्टमधून ठराविक संख्येनेच लोकांना येण्या-जाण्यास परवानगी असेल.
रेस्टॉरंटबाबतचे नियम –
Only asymptomatic staff and customers shall be allowed in the restaurants. Entrance to have mandatory sanitizer dispensers and thermal screening provisions: Union Ministry of Health and Family Welfare#Unlock1 https://t.co/M7fVWts1u8
— ANI (@ANI) June 4, 2020
- रेस्टॉरंटमध्ये केवळ असिम्प्टेमॅटीक कर्मचारी आणि ग्राहकांनाचा परवानगी असेल. प्रवेशद्वारावर सेनेॅझर डिस्पेंसर आणि थर्मल स्क्रिनिंगची तरतुद असणे गरजेचे आहे.
- डाईन ऐवजी जेवणाचे पाकीट घरी देण्यावर भर असावा
- रेस्टॉरंटमध्ये फक्त 50 टक्केच लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असावी
- गेमिंग एरिया, लहान मुलांचा खेळण्याचा परिसर बंदच असावा.
- बुफे सिस्टममध्ये सामाजिक अंतराचे पूर्णपणे पालन करावे लागेल व एक ग्राहक गेल्यानंतर ती जागा पूर्णतः स्वच्छ करणे आवश्यक आहे
या सर्वांमध्ये प्रेत्येक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझरची सोय असावी, परिसर वेळोवेळी स्वच्छ केले जावेत, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे काही नियम कॉमन आहेत.