Representative Image (Photo Credit- ANI)

मोदी सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Union Budget Session) 31 जानेवारी पासून सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये 1 फेब्रुवारी दिवशी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी दिवशी अर्थसंकल्प मांडणार आहेत. हे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आठवे अर्थसंकल्पीय भाषण असणार आहे. दरम्यान या अधिवेशनाचा पहिला भाग 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी असेल तर दुसरा भाग 10 मार्च ते 4 एप्रिल असणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीनंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल.

दिल्ली निवडणुकीच्या दिवशी अधिवेशन काळात संसदेत कोणतेही कामकाज होणार नाही. 3 फेब्रुवारीपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर चर्चा सुरू होईल. Union Budget 2025: यंदा अर्थमंत्री अर्थसंकल्प कधी सादर करणार? अर्थसंकल्पीय भाषण कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या .

मोदी सरकार 3.0 चे पहिलं बजेट

लोकसभा निवडणूकीनंतर सत्तेमध्ये एनडीए सरकार बसलं आहे. त्यामुळे मोदी 3.0 चं हे पहिलं पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणाने या बजेटची सुरूवात होणार आहे. सामान्यांना या बजेट मधून काय मिळणार? याची उत्सुकता लागली आहे. 1 फेबुवारी दिवशी शनिवार असला तरीही बजेट असल्याने शेअर बाजार सुरू ठेवला जाणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागात 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत नऊ बैठका होणार आहेत. त्यानंतर अर्थसंकल्पीय प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी संसद काही काळ खंडीत असेल आणि विविध मंत्रालयांच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आणि अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 10 मार्चपासून पुन्हा कामकाज सुरू करेल. अधिवेशनाचा समारोप 4 एप्रिलला होईल. संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात 27 बैठका होतील.