Union Budget 2025: यंदाचे म्हणजेचं 2025 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) लवकरच सादर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे, यावेळीही हा अर्थसंकल्प (Budget 2025) देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सर्वसामान्यांसाठी नवीन आशा घेऊन येईल. येत्या आर्थिक वर्षाच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या या महत्त्वाच्या घोषणेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येत्या महिन्यात अर्थमंत्री हे महत्त्वाचे दस्तऐवज संसदेत सादर करतील. गेल्या काही काळापासून, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो.
मोदी 3.0 सरकारचा दुसरा अर्थसंकल्प कधी येणार?
यावर्षी देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2025-26) सादर करतील अशी अपेक्षा आहे. तथापि, सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मोदी 3.0 सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असेल. 90 च्या दशकाच्या मध्यापर्यंत, केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात असे, ही परंपरा अनेक दशकांपासून चालू होती. 1997 मध्ये, तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संध्याकाळी 5 ऐवजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करून या बदलाची सुरुवात केली. यामागील मुख्य उद्देश बाजाराला अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देण्यासाठी पुरेसा वेळ देणे हा होता. (हेही वाचा -Union Budget 2025: अर्थसंकल्पात करकपात, वैयक्तिक आयकर सवलत मर्यादा वाढवावी; EY India चा केंद्राला सल्ला)
अर्थसंकल्प 2025 तारीख आणि वेळ -
गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यावेळीही अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करतील अशी अपेक्षा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे हे सलग आठवे बजेट असेल, ज्यामध्ये सहा वार्षिक आणि दोन अंतरिम बजेट समाविष्ट आहेत. (हेही वाचा -
2025 चा अर्थसंकल्प -
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 ची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे नोकरदारांमध्ये आयकर सवलत मिळण्याची आशा वाढत आहे. असं म्हटलं जात आहे की, या वर्षीच्या अर्थसंकल्पात आयकर सवलत मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. कर सवलत मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवता येते. असे झाल्यास करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा होऊ शकतात.
येथे पहा बजेट 2025 लाईव्ह -
अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि संसद टीव्हीवर केले जाईल. संसद टीव्ही आणि दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनेलवर देखील तुम्ही बजेट पाहू शकता. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही या चॅनलवर अर्थसंकल्प थेट पाहू किंवा ऐकू शकता.
केंद्रीय बजेट वेब पोर्टल -
2025 च्या अंतरिम अर्थसंकल्पाचा पेपरलेस फॉर्म केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध असेल. केंद्रीय बजेट वापरकर्ते केंद्रीय बजेट वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) ला भेट देऊ शकतात किंवा अँड्रॉइड आणि iOS वापरकर्ते बहुभाषिक अॅप डाउनलोड करू शकतात. हे अॅप हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.