Union Budget 2021 Live Streaming: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या Doordarshan, DD News सह युट्युब लिंक वरील थेट प्रक्षेपण  इथे पहा!
Union Budget 2021 Live (Photo Credits: File Image)

कोविड 19 च्या आव्हानात्मक काळात यंदाचा अर्थसंकल्प 2021 (Union Budget 2021) विशेष महत्त्वाचा आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील वर्षभरात काही मिनी बजेट्स सादर केल्यानंतर आता आज लोकसभेत पूर्ण अर्थसंकल्प 2021 मांडणार आहे. यंदा हा अर्थसंकल्प पेपरलेस असणार आहे. त्यामुळे टॅबच्या माध्यमातून त्याचे वाचन केले जाईल. हा डिजिटल अर्थसंकल्प नंतर युनियन बजेट अ‍ॅप यावर वाचता येणार आहे. पण तुम्हांला लाईव्ह अर्थसंकल्प ऐकायचा, पहायचा असेल तर तो तुम्हांला 11 वाजता टेलिव्हिजन चॅनल सोबत काही युट्युब हॅन्डल्सवर देखील पाहता येणार आहे.

दूरदर्शन (Doordarshan), डीडी न्यूज (DD News) आणि प्रेस ब्युरो ऑफ इन्फोर्मेशन Press Bureau of Information (PIB) कडून हे लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवले जाणार आहे. इथे पहा बजेट 2021-22 चे मराठीत लाईव्ह अपडेट्स.

कोविड 19 वर भारतात लसीकरण सुरू झाले आहे. मात्र सर्वसामान्यांना ही लस मोफत मिळणार का? हा प्रश्न आज जनतेसमोर आहे. त्यामुळे त्याबाबत आजच्या बजेटमध्ये काही घोषणा होणार का? इंधन दर वाढ, टॅक्स मधून सवलत, नवी शिक्षण पद्धती याकडे आजच्या बजेटमध्ये कोणती मोठी घोषणा करून सर्वसमान्यांना सुखद धक्का मिळणार का? असे अनेक आशा-अपेक्षांनी सामान्यांचं लक्ष बजेटकडे आहे. Economic Survey 2020-21: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल, 2021-22 मध्ये GDP वाढीचा दर 11% ची अपेक्षा व्यक्त.

इथे पहा अर्थसंकल्प 2021-22 लाईव्ह

दरम्यान आज सकाळी राष्ट्रपती भवनातून बजेटवर मंजुरी नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थसंकल्पाला मंजुरी मिळल्यानंतर प्रथम लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.