Turtle Smuggling: उत्तर प्रदेशच्या Etawah येथे 1 कोटी रुपयांचे 2581 कासव जप्त; Sex Power वाढवण्यासाठी टर्टल चीपचा होतो उपयोग
Turtles (Photo credits: Pexels)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) इटावा (Etawah) येथे शुक्रवारी रात्री पोलिसांनी कासवांच्या (Turtles) तस्करीचा डाव उधळून लावला. पोत्यात भरून ट्रकमधून तब्बल 2581 कासवांची तस्करी चालू होती. या कासवांची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी सैफई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिस, वनविभागाचे अधिकारी आणि सोसायटी फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांच्या संयुक्त पथकाने, शुक्रवारी रात्री उशिरा इटावामधील सैफई पोलिस परिसरातील डुमिला गावाजवळ ट्रक आणि व्हॅनवर छापा टाकला आणि स्थानिक पातळीवर ओळखल्या जाणार्‍या 2581 हून अधिक इंडिअन फ्लॅपशेल टर्टलची (Lissemys Punctata) सुटका केली.

पोलिसांनी या टोळीकडून जवळजवळ 30 किलो calipee म्हणजेच चिप्स देखील जप्त केली आहे. एवढ्या चिप्ससाठी किमान शंभर कासव मारले गेले असावेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 च्या अनुसूची-1 अंतर्गत या प्रजातींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. तज्ञाने सांगितले की, निश्चितच कासव तस्करांनी चिप्स तयार करण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात अर्थात मे-जूनमध्ये कासव मारून चिप्स बनविली असावीत. कोरोना काळातील कासव तस्करीची ही पहिली घटना आहे.

इटावाचे पोलिस अधीक्षक, ग्रामीण ओमवीर सिंह म्हणतात की, कासवांनी बनविलेल्या अशा चिप्सची किंमत किमान 30 लाख रुपये असेल. पोलिसांनी सांगितले की, आम्ही टोळीचा मास्टरमाइंड शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याला अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे. (हेही वाचा: खुशखबर! सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण, जाणून घ्या मुंबई, पुणे, नवी दिल्लीसह या महत्त्वाचे शहरांतील आजचा भाव)

इटावाच्या नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये कासवांच्या 11 प्रजाती आढळून येतात. परंतु चिप्स फक्त निल्सोनिया गँगटिस आणि चित्रा इंडिकामधून काढल्या जातात. कासवांच्या चिप्सपासून बनवलेल्या सूपच्या वापरामुळे शारीरिक क्षमता वाढते. या सूपमुळे लैंगिक शक्ती वाढते असा समज आहे. म्हणून, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये टर्टल चिप्स सूप मोठ्या प्रमाणावर विकले जाते. 250 ग्रॅम वजनाच्या कासवापासून 250 ग्रॅम पर्यंत चिप्स बनवल्या जातात.