दिवाळी म्हटलं की सणासुदीचा हंगाम. या दरम्यान अनेक शुभमुहूर्त असल्याने अनेक लग्न, साखरपुडा यांसारखे अनेक शुभकार्ये होतात. नोव्हेंबर, डिसेंबर हा प्रमुख करुन लग्नासाठी अनेक जण निवडतात. अशा वेळी सोन्या-चांदीची (Gold-Silver) मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र यंदा लॉकडाऊन नंतर सोन्याचे भाव (Gold Rate) 50,000 च्या वर गेलेले पाहायला मिळाले. दिवाळी, पाडवा, लक्ष्मीपूजन या सणांदरम्यान देखील सोने 50,000 च्या घरात होते. मात्र आज सोन्याचे दर कमी झाले असून ते 48,000 च्या घरात आले आहे. आज मुंबईत (Mumbai) सोन्याचा भाव प्रतितोळा 48,250 रुपये इतका झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47,250 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे.
मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, नवी दिल्ली, चेन्नई सारख्या महत्त्वांच्या शहरांत देखील सोन्याचे भाव घसरले आहेत.या किंमती Goodreturns या संकेतस्थळावरून देण्यात आलेल्या आहेत. या हेदेखील वाचा- Gold Rate on 23rd November: मुंबई, पुणे, नवी दिल्ली भारतातील महत्वाच्या शहरांमध्ये सोन्याला आली झळाळी, जाणून घ्या आजचे दर
पाहूयात काय आहे या महत्त्वांच्या शहरांतील सोन्याचा दर
शहर | 24 कॅरेट/प्रतितोळा | 22 कॅरेट/प्रतितोळा |
मुंबई | 48,250 रुपये | 47,250 रुपये |
पुणे | 48,250 रुपये | 47,250 रुपये |
चेन्नई | 49,910 रुपये | 45,750 रुपये |
हैदराबाद | 49,100 रुपये | 45,010 रुपये |
नवी दिल्ली | 51,450 रुपये | 47,160 रुपये |
बंगळूरू | 49,100 रुपये | 45,010 रुपये |
सोन्याच्या दरात आलेली ही जबरदस्त घसरण ग्राहकांसाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर कमी होणे अशा लग्नघरातील मंडळीसाठी शुभवार्ता आहे.
दरम्यान चांदीच्या भावात फारसा बदल झालेला नसून चांदी प्रति किलो 59,200 रुपये इतकी आहे. हे मुंबईतील चांदीचे दर आहे. दरम्यान सराफा दुकानामध्ये या दरांमध्ये थोडा बदल असू शकतो. तसेच सोनेच्या दागिन्यांच्या खरेदीमध्ये घडणावळ आणि टॅक्स हा वर खर्च असतो त्यामुळे यंदा सोनं खरेदी करताना हे सारे खर्च लक्षात घेऊन खरेदीचे प्लॅन बनवा.
भारतामध्ये आता फिजिकल गोल्डची वाढती मागणी पाहता सरकारने गोल्ड बॉन्ड्स जाहीर केले आहेत. दर महिन्यात विशिष्ट दरामध्ये आणि ठराविक काळासाठी हे गोल्ड बॉन्ड्स उपलब्ध करून देले जातात.