दिवाळीनंतर सोन्याला चांगलाच भाव (Gold Rate Today) आल्याचे चित्र सध्या भारतीय बाजारात पाहायला मिळत आहे. एक तर सणासुदीचा हंगाम त्यात आता लग्नसराई देखील सुरु झाल्याने सोन्याला चांगलीच झळाळी आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव वधारून सोन्याला चकाकी आली आहे. आज मुंबईत (Mumbai) सोन्याचा भाव प्रति तोळा 50,910 रुपये इतका झाला आहे. तर 22 कॅरेट चा सोन्याचा भाव प्रतितोळा 49,910 इतका झाला आहे. तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्नाचे शुभमुहूर्त असल्याने सोन्यालाही चांगला भाव आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईसह पुणे, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूरू मध्येही सोन्याचे दर वाढले आहेत. पाहूयात देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे आजचे दर
शहर | 24 कॅरेट/प्रतितोळा | 22 कॅरेट/प्रतितोळा |
मुंबई | 50,910 रुपये | 49,910 रुपये |
पुणे | 50,910 रुपये | 49,910 रुपये |
चेन्नई | 52,000 रुपये | 47,620 रुपये |
हैदराबाद | 51,400 रुपये | 47,120 रुपये |
नवी दिल्ली | 53,630 रुपये | 49,170 रुपये |
बंगळूरू | 51,400 रुपये | 47,120 रुपये |
नागपूर | 50,910 रुपये | 49,910 रुपये |
चंदिगड़ | 52,320 रुपये | 48,620 रुपये |
तर चांदीच्या दराविषयी बोलायचे झाले तर, 1 किलो चांदीचा दर 62,300 रुपये इतका आहे. भारतामध्ये आता फिजिकल गोल्डची वाढती मागणी पाहता सरकारने गोल्ड बॉन्ड्स जाहीर केले आहेत. दर महिन्यात विशिष्ट दरामध्ये आणि ठराविक काळासाठी हे गोल्ड बॉन्ड्स उपलब्ध करून देले जातात.
दरम्यान सराफा दुकानामध्ये या दरांमध्ये थोडा बदल असू शकतो. तसेच सोनेच्या दागिन्यांच्या खरेदीमध्ये घडणावळ आणि टॅक्स हा वर खर्च असतो त्यामुळे यंदा सोनं खरेदी करताना हे सारे खर्च लक्षात घेऊन खरेदीचे प्लॅन बनवा.