Scam Calls प्रतिकात्मक प्रतिमा (PC - @ians_india)

भारतीय ग्राहकांना स्पॅम कॉल्स, मेसेज आणि फ्रॉड पासून दूर ठेवण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया कडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. TRAI कडून आता जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल ला 30 दिवसांमध्ये फ्रॉड कॉल्स आणि मेसेज रोखण्यासाठी ठोस भूमिका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता कंपनींना स्पॅम मेसेज आणि फ्रॉड प्रकरणांना रोखण्यासाठी बॅंका आणि अन्य वित्तीय संस्थांना निर्देश दिले आहेत.

TRAI कडून बॅंका आणि वित्तीय संस्थांना सांगितले आहे की लवकरात लवकर मेसेज हेडर्स आणि कॉन्टॅक्ट टेम्प्लेट व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी यामुळे फ्रॉडच्या प्रकरणामध्ये दोषींना पकडता येतील. ट्राई ने यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांना वॉर्निंग दिली होती त्यामध्ये बॅंकांना अल्टिमेटम देण्यात आले होते. TRAI च्या दाव्यानुसार, स्पॅम मेसेजला रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याबाबत पुढील 2 आठवड्यामध्ये रिव्ह्यू केला जावा. गरज पडल्यास नव्या आदेशांना जारी करावे असे देखील सांगितले आहे. TRAI New Rules: खुशखबर! आता मोबाईल फोन्सवर Fake Calls आणि SMS ला बसणार आळा; 1 मे पासून होणार मोठा बदल, घ्या जाणून .

बॅंका, वित्तीय संस्था, इंश्यारंस कंपनी, ट्रेडिंग कंपनी आणि बिझनेस कंपनी एसएमएस द्वारा वेगवेगळ्या टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांना कमर्शिअल मेसेज पाठवत असतात. रेग्यलेटरी फ्रेमवर्क चा विचार करता कमर्शिअल मेसेज साठी कंपन्यांना रजिस्टर हेडर असाईन केला जातो. कंपन्यांना कॉन्टेंट टेम्प्लेट ची गरज असते. जर त्याचा वापर केला नाही तर एसएमएस ग्राहकांना पाठवण्याची अनुमती नसते.

स्पॅम कॉल्स, स्पॅम मेसेज आणि अनवॉन्टेड कमर्शिअल प्रमोशनल मेसेज थांबवण्यासाठी ट्राय अनेक काळापासून पावले उचलत आहे. ट्रायने अलीकडेच टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या सिस्टममध्ये एआय फिल्टर वापरण्यास सांगितले जेणेकरुन वापरकर्त्यांना कॉल सामान्य कॉल आहे की व्यावसायिक कॉल हे ओळखता येईल.