Karnataka Health Minister Dr Sudhakar K. (Photo Credits: ANI)

कर्नाटकचे (Karnataka)  आरोग्य मंत्री डॉक्टर सुधाकर (Dr. Sudhakar) यांनी रविवारी एक वादग्रस्त विधान केले आहे. मंत्र्यांनी दावा केला की, मॉर्डन भारतीय महिलांना एकटे रहावेसे वाटते. तसेच लग्नानंतर मुल जन्माला घालणे सुद्धा त्यांना नको असते. ते सरोगेसीच्या माध्यमातून मुलांना जन्म देण्याची इच्छा ठेवतात. नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अॅन्ड न्यूरोलॉजिकल सायन्स मध्ये वर्ल्ड मेंटल हेल्थ डे च्या दिवशी एका कार्यक्रमाला संबोधित करताना मंत्री सुधाकर यांनी हे विधान केले. तसेच त्यांनी आपले मत व्यक्त असे म्हटले की, महिलांचे असे वागणे पाहता आपल्या विचारात एक मोठा बदल झाला आहे. जो ठिक नसल्याचे मला वाटते असे ही सुधाकर यांनी म्हटले.

भारतीय समाजावर पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाचा उल्लेख करत मंत्र्यांनी म्हटले की, लोकांना आता त्यांचे पालक त्यांच्यासोबत रहावेत असे वाटत नाही. त्यांनी पुढे म्हटले की, ही किती दुर्भाग्याची गोष्ट असून आपण आज पाश्चिमात्य संस्कृतिचे अनुसरण करत आहोत. देशातील मानसिकतेबद्दल बोलताना सुधाकर यांनी म्हटले, भारतातील प्रत्येक सातवा व्यक्ती कोणात्या ना कोणत्या मानसिक आजारामुळे त्रस्त आहे. मंत्र्यांच्या मते, तणाव दूर करणे ही एक कला असून याबद्दल भारतीयांना शिकण्याची गरज नाही आहे. तर फक्त जगाला सांगायचे असते तणाव दूर कसा करता येतो.(Jharkhand: मुलीची उंची कमी असल्याने गावकऱ्यांकडून मारले जायचे टोमणे, प्रियकराने धारधार शस्राने चिरला गळा)

Tweet:

पुढे असे म्हटले की, तणाव दूर करणे हे शिकण्याची कला आपल्याला शिकली पाहिजे. त्यासाठी योगा, ध्यान आणि प्राणायम सारख्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वीच जगाला सांगितल्या आहेत. कोविड19 मानसिक स्थितीबद्दल सुधाकर यांनी म्हटले की, सख्खे नातेवाईक आपल्या प्रिय व्यक्तीला स्पर्श सुद्धा करु शकले नाही. यामुळे त्यांना मानसिक त्रास ही झाला. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे सरकारने कोविड19 रुग्णांचे समुपदेशन करणे सुरु केले आहे. तर कर्नाटकात आतापर्यंत 24 लाख कोविड19 च्या रुग्णांचा समुपदेशन झाल्याचे ही सुधाकर यांनी सांगितले.