Jharkhand: मुलीची उंची कमी असल्याने गावकऱ्यांकडून मारले जायचे टोमणे, प्रियकराने धारधार शस्राने चिरला गळा
Murder | (Photo Credits: PixaBay)

Jharkhand: झारखंड मध्ये एका शुल्लक कारणावरुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची गळा चिरुन हत्या केली कारण तिची उंची कमी होती. गावकरी आणि ओळखीची लोक टोमणे मारयचे आणि मुलगी सातत्याने लग्न करण्याचा दबाव टाकला जात होता. त्यानंतर प्रियकर अजीत याने आपल्या प्रेयसीची धारधार शस्राने हत्या केली.(Azamgarh Rape Case: उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनेत पीडितेला न्याय न मिळाल्याने पोलिस स्टेशनमध्ये संपवले जीवन, मृत्यूनंतर प्रशानसाला आली जाग)

डीसीपी अमित कुमार यांनी असे म्हटले की, हे प्रकरण 5 ऑक्टोंबरचे आहे. खुंटी थाना येथील नेयलडीह जंगलात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह मिळाला होता. मृतदेह मिळाल्यानंतर 6 ऑक्टोंबरला खुंटा ठाण्यात एफआयआर दाखल केला गेला. त्यानंतर मुलीची ओळख ही अंजलि तिर्की अशी पटली.

या प्रकरणी पोलिसांनी असे सांगितले की, प्रेयसी मुलावर लग्न करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होती. तसेच गावातील लोक अजीत याला त्याची गर्लफ्रेंड उंचीने लहान असल्यावरुन टोमणे मारत होते. याच गोष्टीवरुन प्रेमी अजीत याला कळत नव्हते की नेमके काय करायचे.(Rajasthan Shocker: मुलाच्या हव्यासापोटी पत्नीची हत्या, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक)

एके दिवशी अजीतने अंजलि हिला खुंटी येथील जंगलात बोलावले. खुप वेळ हे दोघे एकत्रित होते. तेथे त्याने अंजलि हिच्या बॅगमधील सर्व कापडे काढून ते जाळले. यावर अंजलिने प्रियकराला विचारले असता त्याने तुला नवे कपडे घेऊन देईन असे म्हटले. तोच प्रियकराने अंजलि हिच्यावर कुऱ्हाडीने तिच्या गळावर वार करत हत्या केली. असे कृत्य केल्यानंतर अजीत याने जंगलातून पळ काढला.

पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा मृत अंजलि हिचा मृतदेह जंगलात मिळाला. तर आरोपी अजीत याला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. आरोपीकडून पोलिसांनी कुऱ्हाड, मृत अंजलिचा मोबाइल आणि त्याचा ही मोबाइल जप्त केला.