राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेर (Barmer) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगा होण्यासाठी दुसरे लग्न करायचे असल्याने एका व्यक्तीने पत्नीची गळा आवळून हत्या (Murder) केली आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, असे सांगत आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या वडिलांनीच आईची हत्या केल्याची आरोपीच्या मुलीने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
शेरा रामने असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा बाडमेर जिल्ह्यातील बटाडू रामपुरा गावातील रहिवाशी आहे. दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी आरोपीने त्याची पत्नी आणि आणि मुलीवर काठीने हल्ला केला. त्याचवेळी आरोपीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपीच्या भावाने पोलिसांत अशी तक्रार दाखल केली की, अज्ञात व्यक्तीने त्याचा भाऊ शेरा रामने त्याची पत्नी आणि मुलीवर हल्ला केला. त्याच्या भावाला आणि पुतणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, त्याच्या वहिणीचा गळा आवळल्याने मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Power Crisis India 2021: कोळशाच्या कमतरतेमुळे देशात विजेचे संकट, 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मुलीला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुद्धीवर आलत््यानंतर तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. दरम्यान, आपल्या वडिलांनी आईला काठीने जबर मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला आहे.