Coronavirus (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनची (New Coronavirus Strain) एंट्री भारतात झाली आहे. त्याचे काही रुग्ण बर्‍याच राज्यात आढळून आले आहेत. सध्या या स्ट्रेनबाबत सरकार बरीच काळजी घेत आहे. देशात या स्ट्रेनबाबत चिंतेचे वातावरण असताना यूकेच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेचा अभ्यास या नवीन स्ट्रेनबद्दलची आपली चिंता कमी करू शकतो. जुन्या स्ट्रेनपेक्षा हा नवीन प्रकार अधिक प्राणघातक नसल्याचे अभ्यासानुसार दिसून आले आहे. परंतु त्याची इन्फेक्टीव्हिटी पूर्वीपेक्षा जास्त आहे. सोबतच आरोग्य तज्ज्ञांनी या स्ट्रेनमुळे घाबरू नका असा सल्लाही दिला आहे.

नवभारत टाईम्सशी बोलताना एम्सचे माजी संचालक एमसी मिश्रा यांनी सांगितले की, या अभ्यासात 3600 लोक सामील होते. रूग्णांचे दोन गट केले गेले. एका गटात जुन्या स्ट्रेनचे रूग्ण होते, तर दुसर्‍या वर्गात नवीन स्ट्रेनचे. विशेष गोष्ट म्हणजे, अशा मोठ्या संख्येने रूग्णांपैकी केवळ 42 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यामध्ये जुन्या स्ट्रेनचे 26 रूग्ण आणि नवीन स्ट्रेनचे 16 रुग्ण होते. डॉक्टर मिश्रा म्हणाले की, इस्पितळात भरती झालेल्या रूग्णांपैकी 22 जणांचा मृत्यू झाला. यापैकी नव्या स्ट्रेनने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 12 होती. तर, नवीन प्रकारांच्या बाबतीत ही आकडेवारी 10 पर्यंत पोहोचली. (हेही वाचा: COVID-19 Vaccination in India: कोविड 19 लस भारत भर मोफत उपलब्ध असणार; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)

अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जुन्या स्ट्रेनमुळे रुग्णांना फक्त रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली नाही तर त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले. म्हणूनच, तज्ञांचे म्हणणे आहे की नवीन स्ट्रेनबद्दल घाबरून जाण्याचे कारण नाही. जुन्या स्ट्रेनपेक्षा नवीन स्ट्रेन जास्त संसर्गजन्य आहे, परंतु प्राणघातक नाही. अशा प्रकारे या अभ्यासामुळे देशातील जनतेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सध्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनच्या भीतीने भारताने लागू केलेल्या यूकेच्या विमानावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 8 जानेवारीपासून युकेकडून फ्लाइट ट्रॅफिक सुरू होईल.