प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

हिंगणघाट (Hinganghat) आणि लासलगाव (Lasalgaon) जळीतकांडाच्या नंतर आता तामिळनाडू (Tamilnadu) राज्यात सुद्धा असाच धक्कादायक प्रकार समोर येत आहे. कुड्डालोर (Kuddalor)  जिल्ह्यातील वडालूर (Vadlur) गावात एका बस कंडक्टरने एका लष्करातील जवानाच्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समजत आहे. आरोपी बस कंडक्टरचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे असून सध्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान, या प्रकारात महिलेचे डोके आणि मांड्यांचा भाग जळाला असून महिला 20 टक्के भाजली आहे, या पीडित महिलेवर कुरिंजीपदी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरु आहेत. लासलगाव जळीत कांड: पिडीतेचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू; मुख्य आरोपीची कसून चौकशी सुरु

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला नर्सिंगचे काम करते ही महिला आपली कामावर जाण्यासाठी नेहमी खासगी बसने प्रवास करायची, यावेळी या बसचे कंडक्टर आर. सुंदरमूर्ती यांच्याशी तिची मैत्री झाली, तीन महिन्यांपूर्वी या बस कंडक्टरने पीडितेला प्रपोज केले होते. पण अर्थात आपण विवाहित असल्याचे सांगत महिलेने या प्रस्तावाला नकार दिला होता. काही आठवडे या कंडक्टरने महिलेचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आपले लग्न झालेय आणि आपण दिन मुलांची आई आहोत असे सांगून महिलेने साफ नकार दिला, इतकेच नव्हे तर या त्रासाला वैतागून तिने आरोपीशी बोलणे देखील बंद केले.

या प्रकारामुळे चिडलेल्या कंडक्टरने तिचा बदला घेण्याचे ठरवले. आणि शुक्रवारी सकाळीच पेट्रोलची बाटली घेऊन त्याने पीडितेचे कार्यालय गाठले. यावेळी त्याने पीडितेला बोलण्यासाठी बाहेर बोलावले आणि पीडिता कार्यालयाबाहेर आल्यानंतर कंडक्टरने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले.

दरम्यान, यावेळी पीडिता मदतीसाठी ओरडू लागली. महिलेचा आरडाओरडा ऐकून बाजूने जाणारे लोक धावून आले आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या पीडित महिलेचे पती हे भारतीय सैन्यात असून सध्या त्यांची पोस्टिंग पश्चिम बंगाल मध्ये झालेली आहे, याशिवाय महिलेला दोन अपत्ये आहेत.